Lok Sabha Election Result 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. एनडीएला बहुमत मिळाले आहे, तर इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, दिल्लीत सरकार स्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे. एनडीएचे सरकार स्थापन करण्यामध्ये आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेलुगू देसमच्या चंद्राबाबू नायडूंची महत्वाची भूमिका असणार आहे. दरम्यान, आज सकाळी नितीश कुमार आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी एकाच विमानात प्रवास केल्याचे फोटो व्हायरल झाले. या फोटोमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या.
NDA or INDIA एनडीए की इंडिया? तेलुगू देसमच्या चंद्राबाबू नायडूंनी जाहीर केला मोठा निर्णय
हा फोटो व्हायरल झाल्यानंतर आता विमानात नेमकं काय बोलण झालं, याबाबत तेजस्वी यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या फोटोनंतर नितीश कुमार पुन्हा एकदा इंडिया आघाडीसोबत येऊ शकतात, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर आज माध्यमांनी तेजस्वी यादव यांना प्रश्न विचारले. यावर बोलताना तेजस्वी यादव म्हणाले, 'थोडा धीर धरा, नमस्कार, प्रणाम एवढे बोलणे झाले, पण पुढे काय होते ते पाहा, असं सूचक विधान तेजस्वी यादव यांनी केले. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.
"एनडीए'कडे जास्त संख्याबळ आहे, पण आम्हाला वाटतं जे सरकार होईल ते सरकार बिहारकडे लक्ष द्यावे. आमचं बिहारमध्ये सरकार होतं तेव्हा आम्ही ७५ टक्के आरक्षणाच्या सीमेसाठी प्रस्ताव केला होता. त्या आरक्षणाला सरकारने शेड्युल नऊ मध्ये टाकावे, असंही तेजस्वी यादव म्हणाले. आता नितीश कुमार किंग मेकरच्या भूमिकेत आहेत, तर आता त्यांनी बिहारला विशेष राज्य म्हणून मान्यता मिळवून द्यावी. तसेच त्यांनी जातीय जनगणना करुन घ्यावी, असंही तेजस्वी यादव म्हणाले.
एकाच विमानाने प्रवास
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राजदचे नेते तेजस्वी यादव एकाच विमानाने दिल्लीला रवाना झाले आहेत. आज एनडीए आणि इंडिया आघाडीची बैठक होत आहे. या दोन्ही गटांनी आपापल्या सहकारी पक्षांना सरकार स्थापनेच्या मोर्चेबांधणीसाठी बोलविले आहे. याच नितीशकुमार यांना दोन्ही गटांनी संपर्क साधला आहे. आता नितीश कुमार हे अत्यंत महत्वाकांक्षी असल्याने ते चांगली ऑफर ज्याची असेल त्याच्याकडे उडी मारण्याची शक्यता आहे.
नितीशकुमार यांच्या पाठीमागील जागेवर तेजस्वी बसलेले आहेत. या दोघांच्या चेहऱ्यावर हसू आहे. यावरून काही खेळ रंगणार नाही ना अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.