- हरीश गुप्तानवी दिल्ली : १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन जूनच्या मध्यात बहुधा १८ जून, सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. एकदा अधिवेशनाची तारीख जाहीर झाली की, संसद सचिवालय नवीन संसद भवन इमारतीत सर्व ५४३ नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा आयोजित करण्यासाठी सज्ज झाले आहे. प्रक्रियेनुसार, हंगामी अध्यक्षांची निवड केली जाईल. वीरेंद्र कुमार यांची हंगामी अध्यक्ष म्हणून २०१९ मध्ये निवड करण्यात आली होती.
नवे पंतप्रधान इटलीला जाणार?सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांद्वारे निवड झाल्यानंतर पंतप्रधान १३ ते १५ जून रोजी इटलीत होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीला जाणे अपेक्षित आहे. त्यामुळे हे अधिवेशन १८ जून रोजी होणार आहे. सभागृहाच्या नियम २.८ प्रमाणे अध्यक्षांना त्यांच्या कर्तव्यात मदत करणे. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत अध्यक्षपदी राहणे किंवा कार्यवाहक अध्यक्ष म्हणून एखाद्या सदस्याला बोलावणे ही हंगामी अध्यक्षांची कर्तव्य आहेत.
अहवालातून मिळाले संकेत सरकारी त्रैमासिकातून आलेले अहवाल हे काही संकेत देत आहेत. त्यानुसार, २०२४-२०२५ या वर्षाचा अर्थसंकल्प जुलैच्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाऊ शकतो.पूर्वी लोकसभेच्या निवडणुकीनंतर शपथविधीसाठी संसदेचे एक छोटे सत्र असायचे आणि त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन होत असे. परंतु जून २०१९ मध्ये शपथविधी सत्राला अर्थसंकल्पीय अधिवेशनासोबत जोडून कार्यपद्धती बदलण्यात आली.सुरुवातीला, सत्र १७ जून २०१९ ते २६ जुलै २०१९ या कालावधीत आयोजित करण्याचे ठरविले होते. तथापि, ते ७ ऑगस्ट २०१९ पर्यंत वाढविण्यात आले.