Lok Sabha Election Result 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीचे उद्या निकाल येणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. देशात कोणाचे सरकार स्थापन होणार हे मंगळवारी २ जून स्पष्ट होणार आहे. मात्र, निकालापूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपचे सरकार स्थापन होत असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, निकालावरुन कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी यावेळी इंडिया आघाडी सरकार स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, टीएमसी या विरोधी पक्षांचा समावेश आहे. काँग्रेसचे चाणक्य डीके शिवकुमार यांना एक्झिट पोलबाबत विचारले असता ते म्हणाले, इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होईल.
राहुल गांधी यांनीही एक्झिट पोल फेक असल्याचे म्हटले आहे. हा एक्झिट पोल नाही, तर मोदी मीडिया पोल आहे. हा एक काल्पनिक कौल आहे, असंही गांधी म्हणाले.
लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट
दरम्यान, सोनिया गांधीही एक्झिट पोलवर टीका केली आहे. सोनिया गांधी म्हणाल्या, "आता निकालाची वाट पहावी, फक्त थांबा आणि बघा. आम्ही पूर्ण अपेक्षा करतो की आमचे निकाल एक्झिट पोल दाखवत आहेत त्याच्या अगदी उलट असतील,असंही सोनिया गांधी म्हणाल्या.
एक्झिट पोलचा अंदाज आले समोर
इंडियाला २९५ पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी संध्याकाळी वर्तविला होता. पण त्यापेक्षाही कमी जागा इंडिया आघाडीला मिळतील असा अंदाज पाच एक्झिट पोलनी वर्तविला आहे. सात एक्झिट पोलने वर्तविलेल्या अंदाजांची सरासरी काढली तर एनडीएला सरासरी ३६१ जागा मिळतील तर इंडिया आघाडीला १४५ जागांवर समाधान मानावे लागेल असा निष्कर्ष निघतो.
भाजपला ३११ जागा तर काँग्रेसला ६३ जागा मिळतील. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला ५२ जागांवर विजय मिळाला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकांत एनडीएला ३७१ ते ४०१ जागा मिळण्याची शक्यता इंडिया टीव्ही-सीएनएक्स एक्झिट पोलने व्यक्त केली आहे. इंडिया आघाडीला १०९ ते १३९ जागा जिंकता येतील. तर जन की बात या एक्झिट पोलने एनडीला ३६२ ते ३९२ व इंडिया आघाडीला १४१ ते १६१ जागा मिळतील असे म्हटले आहे. दैनिक भास्करने केलेल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला २८१ ते ३५० व इंडिया आघाडीला १४५ ते २०१ जागा मिळतील असे म्हटले आहे.