नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतून मिळवलेल्या विजयानंतर जनतेला संबोधित केलं आहे. मोदी म्हणाले, नव्या भारतासाठी हा जनादेश मिळाला आहे. देशाच्या कोटी कोटी नागरिकांनी या फकीरची झोळी भरली आहे. जगातली ही सर्वात मोठी घटना आहे. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी देशाची अखंडता गरजेची आहे. आता देशात फक्त दोनच जाती शिल्लक राहणार आहेत. त्यात एक गरीब असतील, तर दुसरी जात ही गरिबीतून मुक्त करणाऱ्यांसाठी काही ना काही योगदान देणाऱ्याची असेल, असंही मोदी म्हणाले आहेत. निवडणूक आयोग, सुरक्षा यंत्रणांना लोकशाही व्यवस्था सृदृढ करण्याबरोबरच निवडणूक प्रक्रिया शांततारीत्या राबवण्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. 130 कोटी नागरिकांनी, जनता जनार्दनानं आम्हाला पुन्हा संधी दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे. पुढे मोदी म्हणाले, स्वतः मेघराज या विजयोत्सवात सहभागी होण्यासाठी आले आहेत. या देशातील नागरिकांना मान झुकवून मी नमन करतो. देश स्वतंत्र झाल्यानंतर देशात बऱ्याच लोकसभा निवडणुका झाल्या, पण या वेळी सर्वाधिक मतदान झालं. भारतीय नागरिकांची लोकशाहीप्रति असलेली बांधिलकी यातून व्यक्त होत आहे. भगवान कृष्णासारखा देश उभा आहे. जनतेनं कृष्णासारखं उत्तर दिलं आहे. हा भारताचा विजय आहे. या निवडणुकीत जर कोणी विजयी झालं असेल तर तो भारत असेल. भाजपा संविधान आणि घटनेच्या संरचनेप्रति आम्ही कटिबद्ध आहोत.
आता देशात फक्त दोनच जाती शिल्लक राहतील; 'तुफानी' विजयानंतर नरेंद्र मोदींचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 9:10 PM