केंद्राचे 'डबल इंजिन' पटरीवरुन उतरले; भाजपशासित राज्यातच पक्षाचे सर्वाधिक नुकसान...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 05:27 PM2024-06-05T17:27:51+5:302024-06-05T17:28:33+5:30

Lok Sabha Election Results : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये पक्षाला मोठा फटका बसला.

Lok Sabha Election Results 2024 : Centre's 'double engine' derailed; Party's losses are highest in BJP-ruled states | केंद्राचे 'डबल इंजिन' पटरीवरुन उतरले; भाजपशासित राज्यातच पक्षाचे सर्वाधिक नुकसान...

केंद्राचे 'डबल इंजिन' पटरीवरुन उतरले; भाजपशासित राज्यातच पक्षाचे सर्वाधिक नुकसान...

Lok Sabha Election Results 2024 : भाजपसाठी यंदाची लोकसभा निवडणूक अतिशय वाईट ठरली आहे. पक्षाला बहुमताचा आकडा गाठता न आल्यामुळे मित्रपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करावी लागणार आहे. विशेष म्हणजे, ज्या राज्यात भाजपचे सरकार आहे, अशा राज्यांमध्ये त्यांना सर्वाधिक फटका बसला. 'डबल इंजिन' सरकारचा गाजावाजा करणाऱ्या पक्षाचे इंजिन पटरीवरुन उतरल्याचे चित्र या राज्यांत पाहायला मिळत आहे.

कोणत्या राज्यात भाजपच्या जागा कमी झाल्या?
उत्तर प्रदेश: यूपीमध्ये 2017 पासून भाजपचे सरकार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला 62 जागा मिळाल्या होत्या, तर यावेळी केवळ 33 जागांवर समाधान मानावे लागले आहेत. म्हणजेच, यूपीमध्ये भाजपला 29 जागांवर फटका बसला आहे. 

महाराष्ट्र : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यातून निर्माण झालेल्या गटांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) सोबत सरकार स्थापन केले. असे असतानाही 2019 मध्ये 23 जागा जिंकणाऱ्या भाजपच्या या वेळी 9 जागा कमी झाल्या. येथे 14 जागा गमावल्या.

बिहार : या वर्षीच भाजप पुन्हा एकदा सत्तेत आले असले तरी लोकसभा निवडणुकीत त्याचा फायदा झालेला नाही. 2019 मध्ये बिहारमध्ये भाजपला 17 जागा मिळाल्या होत्या. आता 2024 च्या निवडणुकीत त्यांना फक्त 12 जागा मिळाल्या आहेत. या राज्यात भाजपने 5 जागा गमावल्या आहेत.

राजस्थान : विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजप राजस्थानमध्ये पुन्हा क्लीन स्वीप करेल, अशी आशा होती. मात्र असे झालेले नाही. राजस्थानमध्ये 2019 मध्ये भाजपला 25 पैकी 24 जागा मिळाल्या, तर एक जागा त्यांच्या NDA मित्रपक्षाला गेली. यंदा झालेल्या निवडणुकीत भाजपला 14 जागा मिळाल्या.

हरियाणा : हरियाणात सत्ता स्थापन करुनही भाजपला फायदा झालेला नाही. 2019 मध्ये हरियाणातील सर्व 10 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी पाच जागांवर समाधान मानावे लागले.

Web Title: Lok Sabha Election Results 2024 : Centre's 'double engine' derailed; Party's losses are highest in BJP-ruled states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.