शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

६८ वर्षांत एप्रिल-मे महिन्यात लोकसभेची पाचवी निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 5:09 AM

२००४ पासून एप्रिल महिन्यालाच पसंती; आयोगाची अवघड परीक्षा

- धनंजय वाखारे नाशिक : लोकसभेसाठी ६८ वर्षांत एप्रिल महिन्यात होणारी ही पाचवी निवडणूक आहे. २००४ पासून भारतीय निवडणूक आयोगाकडून एप्रिल आणि मे महिन्यातच निवडणुका घेतल्या जात आहेत.पहिली लोकसभा निवडणूक तीन टप्प्यात घेण्यात आली होती. ऑक्टोबर १९५१, डिसेंबर १९५१ आणि फेब्रुवारी १९५२ मध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यानंतर १९५७ च्या निवडणुकीपासून निवडणूक आयोगाचा गाडा सुरळीत झाला. १९५७ मध्ये २४ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. १९६२ मध्ये १९ ते २५ फेबु्रवारी, १९६७ मध्ये १७ ते २१ फेबु्रवारी, १९७१ मध्ये १ ते १० मार्च, १९७७ मध्ये १६ ते २० मार्च, १९८० मध्ये जनता पक्षाचे सरकार कोसळल्यानंतर ३ ते ६ जानेवारी तर पुढे चार वर्षांतच १९८४ मध्ये २४ ते २८ डिसेंबर या कालावधीत निवडणूक झाली होती.१९८९ मध्ये २२ ते २६ नोव्हेंबर, १९९१ मध्ये २० मे ते १५ जून तर नरसिंहराव सरकारने पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर १९९६ मध्ये २७ एप्रिल आणि २ ते ३० मे अशा कालावधीत निवडणुका झाल्या. दोन वर्षातच सरकार कोसळल्यानंतर १९९८ मध्ये १६ ते २३ फेब्रुवारी दरम्यान निवडणूक झाली. पुढे एका वर्षातच १९९९ मध्ये ५, ११, १८, २५ सप्टेंबर आणि ३ ते ६ ऑक्टोबर या अशा विविध टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पाडली. १९९९ नंतर सरकार पूर्ण पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करण्यात यशस्वी होत गेले. त्यामुळे २००४ मध्ये २० एप्रिल ते १० मे, २००९ मध्ये १६ एप्रिल ते १३ मे कालावधीत निवडणूक झाली. २०१४ मध्ये ७ एप्रिल ते १२ मे असा महिनाभराचा कालावधी होता.चार दिवसांत निवडणूक प्रक्रिया१९८० मध्ये चार दिवसांत निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा विक्रम भारतीय निवडणूक आयोगाने केला होता. ३ ते ६ जानेवारी या अवघ्या चार दिवसांत निवडणूक प्रक्रिया राबविली गेली. त्यानंतर, १९६७, १९७७, १९८४ आणि १९८९ या वर्षी पाच दिवसांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण केल्याची नोंद आहे. १९९१ च्या निवडणुकीपासून मात्र वेगवेगळ्या टप्प्यांत दीर्घ कालावधीत निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सुरूवात झालेली आहे.कोणत्या राज्यात कोणकोणत्या टप्प्यात होणार मतदानपहिला टप्पा : ११ एप्रिल : ९१ जागा - आंध्र प्रदेश २५ जागा, अरुणाचल २ जागा, आसम ५ जागा, बिहार ४ जागा, छत्तीसगढ १ जागा, जम्मू-काश्मीर २ जाग), महाराष्ट्र ७ जागा, मेघालय १ जागा, मिजोरम १ जागा, ओडिशा ४ जागा, सिक्किम १ जागा, तेलंगाना १७ जागा, त्रिपुरा १ जागा, उत्तर प्रदेश ८ जागा, उत्तराखंड ५ जागा, पश्चिम बंगाल २ जागा, अंदमान निकोबार १ जागा, लक्षद्वीप १ जागा.दुसरा टप्पा : १८ एप्रिल : ९१ जागा - आसम ५, बिहार ५, छत्तीसगढ ५, जम्मू-काश्मीर-२, कर्नाटक १४, महाराष्ट्र १०, मणिपूर १, ओडिशा ५, तमिळनाडू ३९, त्रिपुरा १, उत्तर प्रदेश ८, पश्चिम बंगाल ३, पुद्दुचेरी १.तिसरा टप्पा : २३ एप्रिल : ११५ जागा - आसम ४, बिहार ५, छत्तीसगढ ७, गुजरात २६, गोवा २, जम्मू-काश्मीर १, कर्नाटक १४, केरळ २०, महाराष्ट्र १४, ओडिशा ६, उत्तर प्रदेश १०, प. बंगाल ५, दादर नागर हवेली १, दमन दीव १.चौथा टप्पा : २९ एप्रिल : ७१ जागा - बिहार ५, जम्मू-काश्मीर १, झारखंड ३, मध्यप्रदेश ६, महाराष्ट्र १७, ओडिशा ६, राजस्थान १३, उत्तर प्रदेश १३, पश्चिम बंगाल ८पाचवा टप्पा : ६ मे : ५१ जागा - बिहार ५, जम्मू काश्मीर २, झारखंड ४, मध्यप्रदेश ७, राजस्थान १२, उत्तर प्रदेश १४, पश्चिम बंगाल ७सहावा टप्पा : १२ मे : ५९ जागा - बिहार ८, हरियाणा १०, झारखंड ४, मध्यप्रदेश ८, उत्तर प्रदेश १४, पश्चिम बंगाल ८, दिल्ली ७सातवा टप्पा : १९ मे : ५९ जागा - बिहार ८, झारखंड ३, मध्यप्रदेश ८, पंजाब १३, चंडीगढ़ १, पश्चिम बंगाल ९, हिमाचल ४आजपर्यंतच्या सर्व लोकसभानिवडणुकांच्या तारखा सरकार कोणाचे पंतप्रधान१) १९५१-५२ - ऑक्टोबर १९५१, - काँग्रेस - पं.जवाहरलाल नेहरूडिसेंबर १९५१, फेब्रुवारी १९५२.२) १९५७ - २४ फेब्रुवारी ते १४ मार्च- काँग्रेस- पं.जवाहरलाल नेहरू३) १९६२ - १९ ते २५ फेब्रुवारी- काँग्रेस- पं.जवाहरलाल नेहरू४) १९६७ - १७ ते २१ फेब्रुवारी- काँग्रेस- इंदिरा गांधी५) १९७१ - १ ते १० मार्च- काँग्रेस- इंदिरा गांधी६) १९७७ - १६ ते २० मार्च- जनता- पक्ष मोरारजी देसाई७) १९८० - ३ ते ६ जानेवारी- काँग्रेस- इंदिरा गांधी८) १९८४ - २४ ते २८ डिसेंबर- काँग्रेस- राजीव गांधी९) १९८९ - २२ ते २६ नोव्हेंबर- जनता दल- व्ही.पी.सिंग१०) १९९१ - २० मे ते १५ जून- काँग्रेस- नरसिंह राव११) १९९६ - २७ एप्रिल ते ३० मे - भाजपाप्रणित एनडीए- अटलबिहारी वाजपेयी१२) १९९८ - १६ ते २३ फेब्रुवारी- भाजपाप्रणित एनडीए- अटलबिहारी वाजपेयी१३) १९९९ - ५ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर- भाजपाप्रणित एनडीए- अटलबिहारी वाजपेयी१४) २००४ - २० एप्रिल ते १० मे- काँग्रेसप्रणित युपीए- डॉ.मनमोहनसिंग१५) २००९ - १६ एप्रिल ते १३ मे- काँग्रेसप्रणित युपीए- डॉ.मनमोहनसिंग१६) २०१४ - ७ एप्रिल ते १२ मे- भाजपाप्रणित एनडीए- नरेंद्र मोदी१७) २०१९ - ११ एप्रिल ते १९ मे ? ?(टीप : पं.जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर आधी गुलजारीलाल नंदा हे काळजीवाहू पंतप्रधान झाले. त्यानंतर लालबहादूर शास्री पंतप्रधान झाले.शास्रींच्या निधनानंतर पुन्हा गुलजारीलाल नंदा काळजीवाहू पंतप्रधान झाले. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वातील जनता सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्यावर चौधरी चरणसिंह पंतप्रधान झाले. १९९१ मध्ये व्ही.पी.सिंग सरकार कोसळले आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने चंद्रशेखर पंतप्रधान झाले. १९९६ मध्ये वाजपेयी सरकार तेराच दिवस टिकले आणि आधी एच.डी.देवेगौडा आणि नंतर इंद्रकुमार गुजराल काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्याने पंतप्रधान झाले पण त्यांचे सरकारही अल्पजीवी ठरले.)

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसBJPभाजपा