नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालात यंदा काँग्रेससह इंडिया आघाडीनं सत्ताधारी भाजपाच्या नाकीनऊ आणले. अबकी बार ४०० पार असा नारा देणाऱ्या भाजपाला स्वबळावर २४० जागा मिळाल्या तर त्यांच्या घटक पक्षांना ५३ जागा मिळाल्या. एनडीएला या निकालात २९३ जागा तर इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या आहेत. त्यात ९९ जागा एकट्या काँग्रेसनं जिंकल्या आहेत.
यंदाच्या निकालाची आकडेवारी पाहिली तर काँग्रेसनं इतिहासात पहिल्यांदा ३२७ जागा लढवल्या होत्या तर भाजपाने यंदा ४४१ जागांवर उमेदवार उभे केले होते. मागील २ निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपा यांच्यातील थेट लढतीत भाजपाला फायदा होताना दिसत होतं. परंतु या निवडणुकीत काँग्रेसनं त्यांचा स्ट्राईक रेट वाढवला आणि तब्बल ८० हून अधिक जागांवर भाजपा उमेदवाराचा पराभव केला.
भाजपानं जिंकलेल्या २४० जागांवर कोणते पक्ष पराभूत?
काँग्रेस - १५३समाजवादी पार्टी - २१बीजू जनता दल - २० तृणमूल काँग्रेस - १३आप - ७राष्ट्रीय जनता दल - ७शिवसेना (उबाठा) - ३वायएसआर काँग्रेस - ३बसपा - २सीपीआय - २राष्ट्रवादी शरद पवार गट - २आसाम जातीय परिषद - १सीपीआय एमएल - १सीपीएम - १अपक्ष - १झारखंड मुक्ती मोर्चा - १विकासशील इन्सान पार्टी - १बिनविरोध - १
एकूण - २४० जागा
भाजपा पराभूत झालेल्या २०१ जागांवर या पक्षांनी मारली बाजी
काँग्रेस - ८४समाजवादी पार्टी - ३५तृणमूल काँग्रेस - २९डीएमके - १२राष्ट्रवादी शरद पवार गट - ६अपक्ष - ५आप - ३सीपीएम - ३झारखंड मुक्ती मोर्चा - ३राष्ट्रीय जनता दल - ३वायएसआर काँग्रेस - ३सीपीआय - १मुस्लीम लीग - २एआयएमआयएम - १सीपीआय एमएल - १आरएसपी - १शिवसेना उबाठा - १आझाद समाज पार्टी - १भारत आदिवासी पार्टी - १राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी - १शिरोमणी अकाली दल - १सिक्किम क्रांतीकारी मोर्चा - १विधुथलाई सी कात्ची - १झोरम पीपल मूवमेंट - १
एकूण - २०१