प्रचारासाठी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा वापर; पीएम मोदींविरोधात काँग्रेसची EC कडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 05:26 PM2024-03-20T17:26:41+5:302024-03-20T17:28:31+5:30
देशात आदर्श आचारसंहिता लागू असताना हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा वापर केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
Lok Sabha Election: देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अलीकडेच लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. यानंतर देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली. आता या आचारसंहितेदरम्यान निवडणूक प्रचारासाठी भारतीय हवाई दलाचे(IAF) हेलिकॉप्टर वापरल्याप्रकरणी तामिळनाडूकाँग्रेसने (TNCC) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Election Commission of India) तक्रार केली.
कोणाचेही नागरिकत्व जाणार नाही, मुस्लिमांनी घाबरू नये; CAA बाबत अमित शाह स्पष्टच बोलले
मीडियाशी बोलताना, तामिळनाडूकाँग्रेसचे प्रवक्ते पीव्ही सेंथिल म्हणाले की, माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांना 1975 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाने प्रचारासाठी IAF हेलिकॉप्टर वापरल्याबद्दल अपात्र ठरवले होते. आदर्श आचारसंहितेनुसार कोणत्याही व्यक्तीला प्रचारासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करता येत नाही. हा नियम पंतप्रधान मोदींनाही लागू आहे. भाजप IAF हेलिकॉप्टरसाठी भाडे देत आहे का, हे स्पष्ट करण्याची विनंती आयोगाला केली. तसे असल्यास इतर पक्षाच्या नेत्यांनादेखील याची परवानगी दिली पाहिजे', अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
Complaint against PM Modi with ECI for violating code of conduct 👇
— Saket Gokhale (@SaketGokhale) March 18, 2024
Filed a complaint with the Election Commission against Modi for using an Indian Air Force helicopter to attend an election rally in AC 96-Chilakaluripet in Palnadu, Andhra Pradesh yesterday
EC rules prohibit… pic.twitter.com/vHp8ooE32Z
तृणमूल खासदारानेही केली तक्रार
दोन दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले(Saket Gokhale) यांनीदेखील पंतप्रधान मोदींवर आंध्र प्रदेशमधील निवडणूक रॅलीत भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर वापरुन निवडणूक संहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. गोखलेंच्या तक्रारीनुसार, पीएम मोदींनी 17 मार्च रोजी आंध्र प्रदेशातील पालनाडू जिल्ह्यातील चिलाकलरुपेत झालेल्या सभेसाठी हवाई दलाच्या एमआय 17 हेलिकॉप्टरचा वापर केला होता. याप्रकरणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे.