चंद्राबाबू नायडू नवी दिल्लीत शरद पवार आणि राहुल गांधींची घेणार भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 09:22 AM2018-11-01T09:22:10+5:302018-11-01T10:08:27+5:30
Lok Sabha Election 2019 : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेच्या खुर्चीवरुन खाली खेचण्यासाठी विरोधी पक्षांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे.
नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेच्या खुर्चीवरुन खाली खेचण्यासाठी विरोधी पक्षांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपाला आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मोट बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शरद यादव विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत आहेत. आपला वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेऊन एकत्र या, असे आवाहन ते राजकीय पक्षांना करत आहेत. यादरम्यानच, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आज राजधानी नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे.
(PM पदासाठी राहुल गांधी यांच्यापेक्षा मायावती योग्य; बसपा नेत्याचे विधान)
चंद्राबाबूंनी मायावतींचीही घेतली भेट
महाआघाडीच्या शक्यता पडताळून पाहण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मायावती यांचीही भेट घेतली. बसपाच्या एका नेत्यानं सांगितले की, नायडू यांनी उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांची शनिवारी संध्याकाळी भेट घेतली. यादरम्यान नायडू यांच्यासोबत आंध्र प्रदेशचे अर्थमंत्री आणि पक्षाचे काही खासदार देखील उपस्थित होते.