नवी दिल्ली- काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशमध्ये त्या योगी सरकारला वारंवार लक्ष्य करत आहेत. त्यांनी गेल्या 24 तासांत चार ट्विट्स केले आहेत. ज्यात त्यांनी #Sanchibaatबरोबर शेतकरी, शिक्षण मित्र, आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांचा मुद्दा उपस्थित करत योगी सरकारला घेरलं आहे. ट्विट करत त्या म्हणाल्या, उत्तर प्रदेशमधल्या शिक्षकांचा रोज अपमान होत आहे. अनेक पीडितांनी आत्महत्या केल्या आहेत. जे रस्त्यावर उतरले त्यांच्यावर सरकारनं लाठीचार्ज केला आहे. भाजपा नेते टी-शर्टचं मार्केटिंग करण्यात व्यस्त आहेत, त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणंघेणं नाही. त्यांनी आधी जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत. मी लखनऊमध्ये अनेक शिक्षकांची भेट घेतली.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं मानधन 8470 रुपयांवरून वाढवून 17,000 रुपये करण्याची घोषणा केली होती. परंतु आजमितीस त्यांना वाढीव मानधन प्राप्त झालं नसून त्यांना 8470 रुपयेच पगाराच्या स्वरूपात मिळतात. सरकार खोट्या मुद्द्यांचा प्रचार करत आहे. त्यातच शिक्षकांचा आवाज दडपला जातोय. उत्तर प्रदेशमध्ये अंगणवाडी शिक्षिका आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यायला हवा. भाजपा सरकारनं त्यांची व्यथा ऐकून घेण्याऐवजी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. माझ्या भगिनींचा संघर्ष हा माझा संघर्ष आहे.
भाजपा नेते टी-शर्टच्या मार्केटिंगमध्ये व्यस्त, जनतेच्या प्रश्नांकडे त्यांचं दुर्लक्ष- प्रियंका गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 3:01 PM