"AAP आणि काँग्रेसची युती कायम राहणार नाही, आम्ही फक्त..." केजरीवालांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 04:51 PM2024-05-29T16:51:12+5:302024-05-29T16:51:38+5:30

...म्हणून आप आणि काँग्रेस पंजाबमध्ये एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत.

Lok Sabha Elections 2024: "AAP and Congress have no permanent relationship" Arvind Kejriwal's Big Statement | "AAP आणि काँग्रेसची युती कायम राहणार नाही, आम्ही फक्त..." केजरीवालांचे मोठे विधान

"AAP आणि काँग्रेसची युती कायम राहणार नाही, आम्ही फक्त..." केजरीवालांचे मोठे विधान

Arvind Kejriwal On Congress: लोकसभा निवडणूक (Lok Sabhe Election) अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या 1 जून रोजी सातव्या अन् शेवटचा टप्प्यातील मतदान होणार असून, 4 जून रोजी निकाल जाहीर होतील. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी इंडिया आघाडीबाबत केलेल्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत केजरीवाल म्हणाले की, "आम आदमी पक्षाचा काँग्रेससोबत कायमचा संबंध नाही. आम्ही काय लग्न केले नाही. देश वाचवण्यासाठी 4 जूनपर्यंत आम्ही एकत्र आलो आहोत. भाजपला पराभूत करणे आणि सध्याच्या हुकूमशाही आणि गुंडगिरीला संपवणे, हेच आमचे सध्याचे उद्दिष्ट आहे." 

पंजाबमध्ये आप आणि काँग्रेसमध्ये युती का नाही?
दिल्लीत आप आणि काँग्रेसमध्ये युती आहे, पण पंजाबमध्ये दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत. यावर केजरीवाल म्हणाले, "देश वाचवणे महत्त्वाचे आहे. जिथे जिथे भाजपचा पराभव करण्यासाठी युतीची गरज होती, तिथे आप आणि काँग्रेसने एकत्र येऊन उमेदवार उभे केले. पंजाबमध्ये भाजपचे अस्तित्व नाही."

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही
दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात शिक्षा भोगत असलेले अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. ते म्हणाले, “माझे तुरुंगात परत जाणे हा मुद्दा नाही. या देशाचे भवितव्य पणाला लागले आहे. ते मला हवं तोपर्यंत तुरुंगात ठेवू शकतात, पण मी घाबरत नाही. केवळ भाजपच्या सांगण्यावरून दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही."


 

Web Title: Lok Sabha Elections 2024: "AAP and Congress have no permanent relationship" Arvind Kejriwal's Big Statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.