Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 03:51 PM2024-05-18T15:51:51+5:302024-05-18T16:05:14+5:30
Lok Sabha Elections 2024 Ashok Gehlot And Ram Mandir : काँग्रेस वारंवार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिर बांधल्याचं सांगत आहे. याच दरम्यान आता राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठा दावा केला आहे.
काँग्रेस वारंवार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिर बांधल्याचं सांगत आहे. याच दरम्यान आता राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठा दावा केला आहे. केंद्रात एनडीए नसून यूपीए सरकार असतं तरी राम मंदिर बांधलं असतं असं म्हटलं आहे. अशोक गेहलोत यांनी यामागे एक मोठं कारण देखील सांगितलं आहे.
अशोक गेहलोत म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराबाबत लोकांमध्ये संभ्रम पसरवत आहेत आणि निवडणूक जिंकण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात." एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना भाजपाच्या आरोपांना उत्तर देताना काँग्रेस आल्यास राम मंदिराला कोणताही धोका नाही असं म्हटलं आहे.
#WATCH | Amethi, UP: Former Rajasthan CM Ashok Gehlot says, "Ram Mandir has been constructed on the orders of Supreme Court...Even if the government was of UPA instead of NDA then also the temple would have been constructed...They(BJP) are spreading confusion...The public has… pic.twitter.com/p1FeClrvQk
— ANI (@ANI) May 18, 2024
"सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राम मंदिर बांधलं गेलं आहे. त्यांना संभ्रम आहे. सरकार एनडीएचं नसतं आणि यूपीएचं असतं, भाजपाचं नसतं आणि काँग्रेसचं असतं तरीही मंदिर बांधलं गेलं असतं कारण तो सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. ते संभ्रम पसरवत आहेत. मोदीजी खोटं बोलतात. निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान मोदी कोणत्याही थराला जाऊ शकतात हे जनतेला समजलं आहे" असं अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे.
राजस्थानमध्ये 25 जागांसाठी 19 एप्रिल आणि 26 एप्रिलला दोन टप्प्यात मतदान झालं. मतदान संपल्यानंतर भाजपा आणि काँग्रेसचे राजस्थानचे नेते आता इतर राज्यांतील आपल्या पक्षाच्या नेत्यांचा प्रचार करत आहेत. याच दरम्यान अशोक गेहलोत हे सध्या उत्तर प्रदेशातील अमेठीला भेट देत असून काँग्रेस उमेदवाराच्या समर्थनार्थ जाहीर सभेला संबोधित करत आहेत. भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात काँग्रेसने किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.