शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे चेहऱ्याने जितके भोळे, तितकेच प्रचंड लबाड; रामदास कदमांचा हल्लाबोल
2
जागा वाटपावरून महायुतीत धुसफूस, नेत्यांच्या आदेशाचे उल्लंघन; नेमकं काय चाललंय?
3
Vande Bharat : दे दणादण! वंदे भारत ट्रेन चालवण्यासाठी लोको पायलट भिडले, तुफान राडा घालत गार्डवर हल्ला
4
Sanjay Roy : कोर्टात ढसाढसा रडला संजय रॉय; CBI चे वकील आले ४० मिनिटं उशिरा, न्यायाधीश झाले नाराज
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल!
6
काँग्रेसची ठाकरे-पवारांच्या पक्षातील मतदारसंघातही चाचपणी; 'त्या' जागांवर दावा करणार
7
सर्वाधिक प्लास्टिकचे प्रदूषण करणारा देश, भारताच्या नावे विक्रम, पण अभिमान कसा बाळगणार?
8
अंतराळवीरांविनाच अखेर पृथ्वीवर परतले स्टारलायनर; सुनीता विलियम्स २०२५ मध्ये येणार
9
निवडणुकीनंतरच काश्मीरला राज्य दर्जा, ही निवडणूक ऐतिहासिक; अमित शाहांचं आश्वासन 
10
होय...आमच्या लष्कराचा कारागल युद्धात सहभाग होता; पाकिस्तानची प्रथमच कबुली
11
BREAKING : अन् काही मिनिटांत चांदीचं झालं सोनं; भालाफेकपटू नवदीप भारताचा नवा 'गोल्डन बॉय'
12
सरकार मोठा शॉक द्यायच्या तयारीत; क्रेडीट, डेबिट कार्डने पेमेंट केल्यास १८ टक्के जीएसटी
13
Paris Paralympics 2024: दृष्टीहीन Simran Sharma ची कमाल; भिंगरीसारखी धावली अन् पटकावलं मेडल
14
Puja Khedkar : पूजा खेडकरला आणखी दणका! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
15
पाकिस्तानातील पुढची पिढी अडाणीच राहणार; करोडो मुले शाळेत जातच नाहीत
16
बीएमडब्लूची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेला अन् दोघांना उडवलं; मुलुंड अपघात प्रकरणी आरोपीला अटक
17
उत्तर कोरियात किम जोंग उनची सत्ता उलथविण्याची तयारी? मोठी शक्ती लागली कामाला
18
"फितूरीचे संस्कार दाखवले"; बार्शीहून ३०० गाड्या आल्या, जरांगेंचा आमदार राऊतांवर हल्लाबोल
19
करोडपती बनणे एकदम सोपे, एकदाच गुंतवा १ लाख रुपये; नंतर निवांत व्हा मालामाल; गणित समजून घ्या
20
कोलकात्यात रुग्णालयाचा नवा वाद; ३ तास रक्तस्त्राव, उपचाराअभावी मुलाचा मृत्यू

Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 3:51 PM

Lok Sabha Elections 2024 Ashok Gehlot And Ram Mandir : काँग्रेस वारंवार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिर बांधल्याचं सांगत आहे. याच दरम्यान आता राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठा दावा केला आहे.

काँग्रेस वारंवार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिर बांधल्याचं सांगत आहे. याच दरम्यान आता राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठा दावा केला आहे. केंद्रात एनडीए नसून यूपीए सरकार असतं तरी राम मंदिर बांधलं असतं असं म्हटलं आहे. अशोक गेहलोत यांनी यामागे एक मोठं कारण देखील सांगितलं आहे.

अशोक गेहलोत म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराबाबत लोकांमध्ये संभ्रम पसरवत आहेत आणि निवडणूक जिंकण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात." एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना भाजपाच्या आरोपांना उत्तर देताना काँग्रेस आल्यास राम मंदिराला कोणताही धोका नाही असं म्हटलं आहे. 

"सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राम मंदिर बांधलं गेलं आहे. त्यांना संभ्रम आहे. सरकार एनडीएचं नसतं आणि यूपीएचं असतं, भाजपाचं नसतं आणि काँग्रेसचं असतं तरीही मंदिर बांधलं गेलं असतं कारण तो सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. ते संभ्रम पसरवत आहेत. मोदीजी खोटं बोलतात. निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान मोदी कोणत्याही थराला जाऊ शकतात हे जनतेला समजलं आहे" असं अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. 

राजस्थानमध्ये 25 जागांसाठी 19 एप्रिल आणि 26 एप्रिलला दोन टप्प्यात मतदान झालं. मतदान संपल्यानंतर भाजपा आणि काँग्रेसचे राजस्थानचे नेते आता इतर राज्यांतील आपल्या पक्षाच्या नेत्यांचा प्रचार करत आहेत. याच दरम्यान अशोक गेहलोत हे सध्या उत्तर प्रदेशातील अमेठीला भेट देत असून काँग्रेस उमेदवाराच्या समर्थनार्थ जाहीर सभेला संबोधित करत आहेत. भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात काँग्रेसने किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. 

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी