Priyanka Gandhi : "हा पैसा गेला कुठे, भाजपा सरकार जनतेला कर्जात का बुडवतेय?"; प्रियंका गांधी कडाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 12:17 PM2024-03-30T12:17:04+5:302024-03-30T12:27:29+5:30

Lok Sabha Election 2024 And Priyanka Gandhi : प्रियंका गांधी यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधत सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत.

lok sabha elections 2024 Congress Priyanka Gandhi attack on BJP says why government drowning people in debt | Priyanka Gandhi : "हा पैसा गेला कुठे, भाजपा सरकार जनतेला कर्जात का बुडवतेय?"; प्रियंका गांधी कडाडल्या

Priyanka Gandhi : "हा पैसा गेला कुठे, भाजपा सरकार जनतेला कर्जात का बुडवतेय?"; प्रियंका गांधी कडाडल्या

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधत सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. तसेच "भाजपा सरकार जनतेला कर्जात का बुडवत आहे?" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. "अर्थ मंत्रालयाचे म्हणणे आहे की, भारत सरकार चालू आर्थिक वर्षात 14 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेणार आहे. पण का?"

"स्वातंत्र्यापासून 2014 पर्यंतच्या 67 वर्षांत देशावर एकूण 55 लाख रुपये कर्ज होते. गेल्या 10 वर्षात एकट्या मोदीजींनी ते 205 लाख कोटी रुपये केले. गेल्या 10 वर्षांत सुमारे 150 लाख कोटी रुपयांचे कर्ज या लोकांनी घेतलं आहे. आज देशातील प्रत्येक नागरिकावर सरासरी कर्ज सुमारे दीड लाख रुपये आहे. हा पैसा राष्ट्रनिर्माणाच्या कोणत्या कामासाठी वापरला जात आहे?"

"नोकऱ्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या की प्रत्यक्षात नोकऱ्या गायब झाल्या? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का? शाळा आणि रुग्णालयांचं काय झालं? सार्वजनिक क्षेत्र मजबूत झाले की कमकुवत झाले? मोठे- मोठे कारखाने आणि उद्योग उभारले गेले का?"

"जर असे झाले नाही, जर अर्थव्यवस्थेच्या मुख्य क्षेत्रांची दुरवस्था झाली असेल, जर श्रमशक्ती कमी झाली असेल, जर छोटे आणि मध्यम उद्योग उद्ध्वस्त झाले असतील - तर हा पैसा गेला कुठे? कोणत्या गोष्टीवर किती पैसा खर्च झाला? मोठ्या अब्जाधीशांच्या कर्जमाफीवर किती पैसे खर्च झाले?"

"आता सरकार नवे कर्ज घेण्याची तयारी करत असताना, गेल्या 10 वर्षांपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याऐवजी बेरोजगारी, महागाई आणि आर्थिक संकटाचा ओझं वाढत असताना, भाजपा सरकार जनतेला कर्जात का बुडवत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे" असं देखील प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

Web Title: lok sabha elections 2024 Congress Priyanka Gandhi attack on BJP says why government drowning people in debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.