सुरेश डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्कजम्मू : निवडणुकांमध्ये अनेकदा एकाच कुटुंबातील लाेक एकमेकांविराेधात उभे राहिलेले दिसतात. काश्मीरमध्ये यावेळी जरा वेगळेच चित्र आहे. मुलासाठी पिता लाेकसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरला आहे. तर आईसाठी मुलीने प्रचाराची धुरा सांभाळली आहे. फरक फक्त एवढाच की, दाेघांचे मतदारसंघ वेगवेगळे आहेत. हे वडील म्हणजे, फारुख अब्दुल्ला आणि मुलगी म्हणजे इल्जिता मु्फ्ती.
माजी मुख्यमंत्री व नॅशनल काॅन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला हे बारामुल्ला येथून लाेकसभा लढवित आहेत. त्यांच्यासाठी फारुख अब्दुल्ला प्रचारात उतरले आहेत. इल्जिता या आई महबूबा मुफ्ती यांच्यासाठी प्रचार करीत आहेत. पीडीपीच्या नेत्या महबूबा मुफ्ती या राजाैरी-अनंतनाग मतदारसंघातून लढत आहेत.