'काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लिम लीगची छाप', पीएम नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 05:26 PM2024-04-06T17:26:54+5:302024-04-06T17:28:09+5:30
PM Modi In Up: नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथे सभा घेतली, यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
PM Modi Attacked Congress: लोकसभा निवडणूक जवळ आली आहे, त्यामुळे भाजप आणि काँग्रेस नेते सातत्याने एकमेकंवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये झालेल्या सभेतून काँग्रेस, सपा आणि इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे वर्णन "मुस्लिम लीगची छाप" असे केले. आजची काँग्रेस भारताला पुढे नेऊ शकत नाही. काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लीम लीगचे विचार प्रतिबिंबित करतो, अशी टीका मोदींनी केली.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरुन हे सिद्ध होते की, आजची काँग्रेस भारताला पुढे नेऊ शकत नाही. या देशातील जनतेने माझे काम पाहिले आहे. माझा प्रत्येक क्षण देशाच्या नावावर आहे. देशातील जनतेचे स्वप्न हाच माझा संकल्प आहे. आम्ही भ्रष्टाचारावर करत असलेला हल्ला, तुमच्या चांगल्या भविष्यासाठी आहे. भ्रष्टाचारामुळे गरिबांची स्वप्ने धुळीस मिळतात. तुमच्या मुलांचे भविष्य वाचवण्यासाठी मी रोज विरोधकांच्या शिव्या खातोय, असंही पंतप्रधान म्हणाले.
कांग्रेस, आज के भारत की आशाओं-आकांक्षाओं से पूरी तरह कट चुकी है।
— BJP (@BJP4India) April 6, 2024
कांग्रेस के घोषणा पत्र में वही सोच झलकती है, जो आजादी के आंदोलन के समय मुस्लिम लीग में थी।
कांग्रेस के घोषणा पत्र में पूरी तरह मुस्लिम लीग की छाप है और इसका जो कुछ हिस्सा बचा रह गया, उसमें वामपंथी पूरी तरह हावी हो… pic.twitter.com/vjjGS3QC8D
यावेळी मोदींनी पुन्हा एकदा राहुल गांधींच्या 'शक्ती'विरोधातील वक्तव्यावर टीका केली. मोदी म्हणाले की, आपल्या देशात शक्तीची पूजा केली जाते. पण, इंडिया आघाडीचे लोक या शक्तीलाच आव्हान देतात, हे देशाचे दुर्दैव आहे. त्यांचा लढा शक्तीविरोधात आहे. शक्ती कोणी संपवू शकेल का? ज्यांनी शक्ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्यांचे काय हाल झाले, त्याची इतिहासाच्या पानावर नोंद आहे. गरीबांचे कल्याण, ही भाजपसाठी निवडणूक घोषणा नसून आमचे ध्येय आहे. काँग्रेस जे अनेक दशकात करू शकली नाही, ते भाजपने दोन दशकात करून दाखवले. इंडिया आघाडी कमिशनसाठी आहे, तर एनडीए मिशनसाठी आहे, असंही मोदी म्हणाले.
तीन तलाक कायद्याचा मुस्लीम पुरुषांना कसा फायदा झाला? खुद्द पंतप्रधान मोदींनीच समजावून सांगितलं!
2014चे ते दिवस आठवा, जेव्हा देश मोठ्या निराशा आणि संकटाच्या काळातून जात होता. तेव्हा मी तुम्हाला हमी दिली होती की, मी देशाला झुकू देणार नाही, देशाला थांबू देणार नाही. मी संकल्प केला होता की, तुमच्या आशीर्वादाने देशातील प्रत्येक शहराचा चेहरा मोहरा बदलेन. मी प्रत्येक परिस्थिती बदलेन, मी निराशेला आशेत बदलेन, मी आशाला विश्वासात बदलेन. तुम्ही तुमचा आशावाद सोडला नाही आणि मीही मेहनतीत कोणतीही कसर सोडली नाही. तुमच्यामुळेच भारताचे नाव जगभरात घुमत आहे, असेही मोदी म्हणाले.