भाजपाने लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारांची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे. यावेळी वरुण गांधी यांना उत्तर प्रदेशातील पीलीभीत लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलेलं नाही. याच दरम्यान आर सुलतानपूरमधील भाजपा उमेदवार मनेका गांधी यांनी मी भाजपामध्ये खूप खूश असल्याचं म्हटलं आहे.
मनेका गांधी एएनआयशी बोलताना म्हणाल्या, "मी भाजपामध्ये आहे याचा मला खूप आनंद आहे. मला तिकीट दिल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि जेपी नड्डा यांचे आभार मानते. तिकीट जाहीर होण्यास उशीर झाला त्यामुळे मी सुलतानपूर की पीलीभीतमधून निवडणूक लढवणार असा पेच निर्माण झाला होता. पक्षाने आता घेतलेल्या निर्णयाबद्दल मी आभारी आहे. मी सुलतानपूरला परत आले याचा मला खूप आनंद आहे कारण या ठिकाणचा इतिहास असा आहे की सुलतानपूरचा एकही खासदार पुन्हा सत्तेत आलेला नाही."
वरुण गांधींबाबत काय म्हणाल्या मनेका गांधी?
वरुण गांधींचं पीलीभीतमधून तिकीट कापल्याबाबत विचारलं असता मनेका गांधी म्हणाल्या की, “त्यांना काय करायचं आहे हे त्यांनाच विचारा. निवडणुकीनंतर याचा विचार करू. वेळ आहे." या लोकसभा निवडणुकीत भाजपाने पीलीभीतचे खासदार वरुण गांधी यांना तिकीट दिलेलं नाही. त्यांच्या जागी यूपीचे कॅबिनेट मंत्री जितन प्रसाद यांना तिकीट देण्यात आलं आहे.
101 गावांचा दौरा करणार मनेका गांधी
मनेका गांधी यांच्या सुलतानपूर दौऱ्याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, त्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील 101 गावांना भेट देणार आहेत. कटका गुप्तारगंज, तातियानगर, टेढुई, गोलाघाट, शाहगंज चौक, दरियापूर तिराहा आणि पयागीपूर चौक या ठिकाणी पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले आहे.