शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
2
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
3
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य
4
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
5
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
6
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
7
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
8
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
9
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
10
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
11
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
12
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
13
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
14
ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
15
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
16
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
17
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
18
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
19
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
20
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक

हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 1:50 AM

Lok Sabha Elections 2024: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्याविरोधात तेलंगणामध्ये एमसीसी उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्याविरोधात तेलंगणामध्ये एमसीसी उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक रॅलीमध्ये मुलांचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.

ईमेलच्या माध्यमाने करण्यात आलेल्या तक्रारीत म्हणण्यात आले आहे, “निवडणूक आयोगाने नुकतेच, राजकीय पक्षांना मुलांची सेवा आणि निवडणुकीशी संबंधित प्रचारात अथवा उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग घेऊ नये, असे निर्देश दिले आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी आज, म्हणजेच 1-5-2024 रोजी तेलंगणाच्या हैदराबाद लोकसभा मतदारसंघात लादरवाजा ते सुधा टॉकीजपर्यंत एका निवडणूक रॅलीमध्ये भाग घेतला होता. या रॅलीचा समारोप सुधा टॉकीजमध्ये एका सार्वजनिक बैठकीने झाला. येथे आपण, व्यासपीठावर अमित शाह यांच्यासोबत काही मुले बघू शकता. यात एक मुलगा भाजपच्या चिन्हासह दिसून आला. हे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे स्पष्ट उल्लंघन आहे. आपल्या माहितीसाठी आम्ही सोबत एक फोटोही जोडत आहोत.” 

या लोकांविरोधात गुन्हा दाखल...-तक्रारीत म्हणण्यात आले आहे की, छायाचित्रे आणि व्हिडीओग्राफीच्या आधारे ज्या कथित आरोपी व्यक्तींची ओळख पटली त्यांत, टी यमन सिंह, हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या कोम्पेला माधवी लता, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री किशन रेड्डी आणि आमदार टी. राजा सिंह आदींचा समावेश आहे. हे निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे स्पष्ट उल्लंघन आहे आणि एक फोटोकॉपीही जोडली आहे. ती तथ्यात्मक रिपोर्टसाठी हैदराबाद शहराचे पोलीस आयुक्त वाइस रेफरी 2 सिटीला पाठवण्यात आली आहे. याशिवाय SHO मोगलपुरा यांना आवश्यक कारवाईसाठी देण्यात आली आहे.

यासंदर्भात बोलताना पोलीस निरीक्षक पीएन दुर्गा प्रसाद म्हणाले, 02/05/2024 रोजी सायंकाळी 7:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार, टीपीसीसीचे वरिष्ठ उपाध्यक्ष जी. निरंजन यांनी सीईओ तेलंगणा राज्यला एक मेल पाठवला होता. जो तथ्यात्मक रिपोर्टसाठी सीपी-हैदराबादला पाठवण्यात आला होता आणि तोच आवश्यक त्या कारवाईसाठी मुगलपुरा पोलीस ठाण्याला पाठवडला. मिळालेल्या माहितीच्या आधारे मी Cr.No: 77/2024, U/S: 188 IPC अंतर्गत गुन्हा नोंदवला असून तपास सुरू करण्यात आला आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४madhavi lathaवि. के. माधवी लताAmit Shahअमित शाहElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपाPoliceपोलिस