शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
2
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
3
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
4
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
5
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
6
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
7
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
8
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
9
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
10
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
11
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
12
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
13
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
14
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
15
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
16
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
17
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
18
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
19
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
20
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण

"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 3:34 PM

Elections 2024: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पत्राद्वारे मोदी सरकारच्या निर्णयांवर जोरदार टीका केली.

Lok Sabha Elections 2024 Latest News : लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. सातव्या अन् शेवटच्या टप्प्यातील मतदान येत्या 1 जून रोजी होणार आहे. तत्पूर्वी, भारताचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांनी या मतदानापूर्वी मतदारांना विशेष आवाहन करण्यासाठी एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही जोरदार टीका केली आहे. 

'हीच शेवटची संधी...'डॉ. मनमोहन सिंग म्हणाले, "माझ्या प्रिय नागरिकांनो, सध्या भारत एका गंभीर वळणावर उभा आहे. मतदानाच्या या अंतिम टप्प्यात निरंकुश राजवटीचा अंत करुन आपल्या लोकशाहीचे आणि संविधानाचे रक्षण करण्याची ही शेवटची संधी आहे. पंजाब आणि पंजाबी हे योद्धे आहेत. आपण आपल्या त्यागाच्या भावनेसाठी ओळखले जातो. लोकशाही व्यवस्थेवरील आपला एकोपा, सौहार्द आणि जन्मजात विश्वास आपल्या महान राष्ट्राचे रक्षण करू शकतो."

'पंतप्रधानांनी असंसदीय भाषा वापरली'मनमोहन सिंग यांनी आपल्या पंतप्रधान मोदींवरही टीका केली. ते म्हणाले, "मी या निवडणुकीतील राजकीय चर्चा अतिशय काळजीपूर्वक ऐकतोय. पंतप्रधान मोदींनी अतिशय द्वेषपूर्ण भाषणे दिली आहेत, जी पूर्णपणे फूट पाडणारी आहेत. नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांच्यामुळे पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा आणि गांभीर्य कमी झाले. याआधी कोणत्याही पंतप्रधानाने माझ्याविरुद्ध अशी घृणास्पद, असंसदीय आणि खालची भाषा वापरली नाही."

'भाजपने पंजाबची बदनामी केली'मनमोहन सिंग पुढे लिहितात, "गेल्या दहा वर्षांत भाजप सरकारने पंजाब आणि पंजाबच्या जनतेला बदनाम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. पंजाबमधील शेतकरी अनेक महिने दिल्लीच्या सीमेवर आंदोलनाला बसले, 750 शेतकरी शहीद झाले. सरकारने काय केले, तर त्यांच्यावर हल्ला केला. संसदेत शेतकऱ्यांना 'आंदोलनजीवी' आणि 'परजीवी' म्हटले गेले. मोदींनी 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र उलट 10 वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले," अशी टीकाही त्यांनी या पत्रातून केली. 

'सरकारचे अनेक निर्णय चुकले'मनमोहन सिंग यांनीही पत्रात मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. त्यांनी लिहिले की, "गेल्या 10 वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेत अकल्पनीय उलथापालथ झाली. नोटाबंदी, जीएसटीची चुकीची अंमलबजावणी, कोरोना लॉकडाऊनचा निर्णय, यामुळे दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजप सरकारच्या कार्यकाळात जीडीपीचा सरासरी वाढीचा दर 6 टक्क्यांहून कमी राहिला आहे, तर काँग्रेस-यूपीएच्या कार्यकाळात तो 8 टक्क्यांच्या आसपास होता," असेही ते म्हणाले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Manmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस