Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 12:50 PM2024-05-04T12:50:45+5:302024-05-04T13:00:59+5:30
Lok Sabha Elections 2024 Narendra Modi And Congress : झारखंडमधील पलामू येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सांगितलं की, "तुम्ही जेएमएम आणि काँग्रेसला दिवसाच तारे दाखवले आहेत. तुमच्या एका मताचे महत्त्व तुम्हा सर्वांना चांगलंच माहीत आहे."
झारखंडमधील पलामू येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सांगितलं की, "तुम्ही जेएमएम आणि काँग्रेसला दिवसाच तारे दाखवले आहेत. तुमच्या एका मताचे महत्त्व तुम्हा सर्वांना चांगलंच माहीत आहे. 2014 मध्ये तुमच्या एका मताने असं काम केलं की, संपूर्ण जग भारताच्या लोकशाहीच्या ताकदीला सलाम करू लागलं. 2014 मध्ये तुमच्या एका मताने काँग्रेसं भ्रष्ट सरकार हटवलं होतं. तुमच्या एका मताने देशात भाजपा-एनडीएचे सरकार स्थापन झालं."
"500 वर्षे आमच्या किती मुली संघर्ष करत राहिल्या, लाखो लोक शहीद होत राहिले, खूप मोठा संघर्ष होता, एवढा मोठा संघर्ष जगात कुठेही झाला नसेल, जो अयोध्येत झाला. तुमच्या मताच्या बळावर आज राम मंदिर बांधलं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये दररोज धोक्याची घंटा वाजत राहिली. तुमच्या मताने कलम 370 ची भिंत जमीनदोस्त झाली आहे" असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
#WATCH | Palamu, Jharkhand: Addressing a public rally PM Modi says, "In Jharkhand, Odisha, Chhattisgarh, Bihar, Andhra Pradesh, every day from Pashupati to Tirupati, Naxalites were spreading terrorism. So many mothers lost their sons. Their sons used to take up weapons and run… pic.twitter.com/R54jlaT0bK
— ANI (@ANI) May 4, 2024
"दररोज आपल्या झारखंड, छत्तीसगड, ओरिसा, आंध्रमध्ये पशुपतीपासून तिरुपतीपर्यंत नक्षलवाद आणि दहशतवाद पसरवत आहे. किती मातांनी आपला तरुण मुलगा गमावला, जो बंदूक उचलून जंगलात पळून जायचा. तुमच्या मताने अनेक मातांची मुलं वाचली. काँग्रेसच्या काळात येथे बॉम्बस्फोट व्हायचे आणि दिल्ली सरकार शांततेच्या आशेने पाकिस्तानला प्रेमपत्रं पाठवत असे. पाकिस्तानात गेलेले प्रत्येक पत्र त्यांनी तिथून अनेक दहशतवाद्यांना पाठवले आणि देशात रक्ताची होळी झाली."
"तुमच्या मताने माझ्यात इतकं बळ भरलं की मी येताच म्हटलं की हा खेळ आता चालणार नाही. नवीन भारत घरात घुसून मारतो. सर्जिकल स्ट्राईकच्या थप्पडने पाकिस्तान हादरला. पूर्वी दहशतवादी हल्ल्यांनंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान जगभर रडत आहे. आज पाकिस्तानचे नेते काँग्रेसच्या राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी प्रार्थना करत आहेत पण सशक्त भारताला आता मजबूत सरकार हवे आहे. मोदी सरकार हे मजबूत सरकार असल्याचं आता सर्वजण म्हणत आहेत" असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी हल्लाबोल केला आहे.