'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 07:49 PM2024-05-02T19:49:00+5:302024-05-02T19:49:35+5:30
PM Modi Election Rally: 'काँग्रेसने सत्तेसाठी देशाची फाळणी केली. काँग्रेस सत्तेत असेपर्यंत देशाची सुरक्षा धोक्यात होती.'
PM Modi Targeted Congress: लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यातील मतदान झाले असून, तिसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या 7 मे रोजी होणार आहे. यासाठी सर्वच पक्षातील नेते विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. याच क्रमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (02 मे) गुजरातच्या जुनागडमध्ये झालेल्या सभेतून काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस अध्यक्षांनी म्हटले की, त्यांचा उद्देश प्रभू रामाचा पराभव करणे आहे. काँग्रेससाठी ही निवडणूक भगवान श्रीरामाविरोधात लढण्याची निवडणूक बनली आहे. भगवान श्रीरामाचा पराभव करुन कोण जिंकेल? याच विचाराने मुघलांनी आमचे राम मंदिर, सोमनाथाचे मंदिर पाडले. काँग्रेससाठी ही निवडणूक आपले अस्तित्वाची निवडणूक बनली आहे, अशी टीका मोदींनी यावेळी केली.
देश की आजादी से पहले भारत के विभाजन के लिए जो नैरेटिव गढ़े गए थे, आज कांग्रेस का घोषणा पत्र उन्ही बातों को लेकर देशवासियों से वोट मांग रहा है।
— BJP (@BJP4India) May 2, 2024
इंडी अलायंस की रैलियों में उनके नेता मुस्लिम वोटर्स से वोट जिहाद करने की अपील कर रहे हैं।
- पीएम श्री @narendramodi
पूरा वीडियो… pic.twitter.com/r0SmsfjpTN
पीएम मोदींचे काँग्रेसला आव्हान
सीएएच्या मुद्द्यावर बोलताना पीएम मोदी म्हणाले, काँग्रेसचा दुसरा अजेंडा सीएए आहे. आपल्या शेजारील देशात राहणारे लोक, ज्यांचा दोष फक्त एवढाच आहे की, ते हिंदू, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी धर्माचे पालन करतात. त्यांचा तिथे अनन्वित छळ केला जातो. त्या छळाला कंटाळून ते भारतात आले. मी त्यांच्यासाठी नागरिकत्व कायदा बनवला, पण काँग्रेसवाले म्हणतात की, आम्ही तो कायदा रद्द करणार. मी काँग्रेसला आव्हान देतो, तुम्ही ना कलम 370 परत आणू शकता, ना CAA रद्द करू शकता...
कांग्रेस ने 2014 में जब सत्ता छोड़ी, तब हमारे देश की अर्थव्यवस्था दुनिया में 11वें नंबर पर थी।
— BJP (@BJP4India) May 2, 2024
देश जब आजाद हुआ था, तब देश की अर्थव्यवस्था 6ठें नंबर पर थी, वहां से ये लोग (कांग्रेस) 11वें नंबर पर ले गए।
जब एक चायवाला आया तो दुनिया में 11वें नंबर पर जो हमारी इकोनॉमी थी, वो अब… pic.twitter.com/d7adwE4oEH
कलम 370 जमिनीत गाडले
कलम 370 बाबत ते म्हणाले, सरदार पटेल नसते तर आज जुनागडही पाकिस्तानात गेले असते. ही निवडणूक माझ्यासाठी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नाही. ही निवडणूक मोदीच्या मिशनसाठी आहे. माझे ध्येय देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे, देशाला पुढे नेण्यासाठी आहे. काँग्रेसचा अजेंडा काय तर, काश्मीरमधील कलम 370 रद्द करणे. पंचायतीपासून संसदेपर्यंत ज्यांचे सरकार होते, पण त्यांना देशाची राज्यघटना संपूर्ण देशात लागू करता आली नाही. भारतात एक राज्यघटना होती अन् जम्मू-काश्मीरमध्ये वेगळीच राज्यघटना होती. सरदार पटेल असते तर जम्मू-काश्मीरमध्ये भारताची राज्यघटना अभिमानाने लागू झाली असती. पण, आज आम्ही कलम 370 जमिनीत गाडले. हा मोदी आहे, तुम्ही स्पर्धा करू शकणार नाही, असे आव्हान त्यांनी यावेळी काँग्रेसला दिले.
आप (कांग्रेस) देश में न फिर से धारा-370 ला पाओगे, न CAA हटा पाओगे न ही दोबारा तीन तलाक को Allow कर पाओगे... ये मोदी है, मुकाबला नहीं कर पाओगे।
- पीएम श्री @narendramodi
पूरा वीडियो देखें : https://t.co/TlXrXCPX9mpic.twitter.com/eC0M6fSHIe— BJP (@BJP4India) May 2, 2024
‘मोहब्बत की दुकान'मध्ये खोटं काम
काँग्रेसने सत्तेसाठी देशाची फाळणी केली. काँग्रेसने श्रीलंकेला कचठेवू बेट दिले. काँग्रेस सत्तेत असेपर्यंत देशाची सुरक्षा धोक्यात होती. ते हिमालयाचा सौदा करायलाही मागे-पुढे पाहणार नाहीत. गुजरातच्या किनारी भागात अनेक बेटे आहेत, जिथे कोणीही राहत नाही. काँग्रेस अशा बेटांचाही सौदा करू शकते. गुजरातबाबत काँग्रेसच्या मनात जो राग आणि द्वेष आहे, काँग्रेस सत्तेत आल्यास देशासाठी आणि गुजरातसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. ते भाजप नेत्यांचे फेक व्हिडिओ बनवतात. प्रेमाच्या दुकानात उघडपणे खोटं काम करतात, अशी टीकाही नरेंद्र मोदींनी यावेळी केली.