शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 7:49 PM

PM Modi Election Rally: 'काँग्रेसने सत्तेसाठी देशाची फाळणी केली. काँग्रेस सत्तेत असेपर्यंत देशाची सुरक्षा धोक्यात होती.'

PM Modi Targeted Congress: लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यातील मतदान झाले असून, तिसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या 7 मे रोजी होणार आहे. यासाठी सर्वच पक्षातील नेते विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. याच क्रमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (02 मे) गुजरातच्या जुनागडमध्ये झालेल्या सभेतून काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस अध्यक्षांनी म्हटले की, त्यांचा उद्देश प्रभू रामाचा पराभव करणे आहे. काँग्रेससाठी ही निवडणूक भगवान श्रीरामाविरोधात लढण्याची निवडणूक बनली आहे. भगवान श्रीरामाचा पराभव करुन कोण जिंकेल? याच विचाराने मुघलांनी आमचे राम मंदिर, सोमनाथाचे मंदिर पाडले. काँग्रेससाठी ही निवडणूक आपले अस्तित्वाची निवडणूक बनली आहे, अशी टीका मोदींनी यावेळी केली.

पीएम मोदींचे काँग्रेसला आव्हानसीएएच्या मुद्द्यावर बोलताना पीएम मोदी म्हणाले, काँग्रेसचा दुसरा अजेंडा सीएए आहे. आपल्या शेजारील देशात राहणारे लोक, ज्यांचा दोष फक्त एवढाच आहे की, ते हिंदू, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी धर्माचे पालन करतात. त्यांचा तिथे अनन्वित छळ केला जातो. त्या छळाला कंटाळून ते भारतात आले. मी त्यांच्यासाठी नागरिकत्व कायदा बनवला, पण काँग्रेसवाले म्हणतात की, आम्ही तो कायदा रद्द करणार. मी काँग्रेसला आव्हान देतो, तुम्ही ना कलम 370 परत आणू शकता, ना CAA रद्द करू शकता...

कलम 370 जमिनीत गाडलेकलम 370 बाबत ते म्हणाले, सरदार पटेल नसते तर आज जुनागडही पाकिस्तानात गेले असते. ही निवडणूक माझ्यासाठी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नाही. ही निवडणूक मोदीच्या मिशनसाठी आहे. माझे ध्येय देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे, देशाला पुढे नेण्यासाठी आहे. काँग्रेसचा अजेंडा काय तर, काश्मीरमधील कलम 370 रद्द करणे. पंचायतीपासून संसदेपर्यंत ज्यांचे सरकार होते, पण त्यांना देशाची राज्यघटना संपूर्ण देशात लागू करता आली नाही. भारतात एक राज्यघटना होती अन् जम्मू-काश्मीरमध्ये वेगळीच राज्यघटना होती. सरदार पटेल असते तर जम्मू-काश्मीरमध्ये भारताची राज्यघटना अभिमानाने लागू झाली असती. पण, आज आम्ही कलम 370 जमिनीत गाडले. हा मोदी आहे, तुम्ही स्पर्धा करू शकणार नाही, असे आव्हान त्यांनी यावेळी काँग्रेसला दिले.

‘मोहब्बत की दुकान'मध्ये खोटं कामकाँग्रेसने सत्तेसाठी देशाची फाळणी केली. काँग्रेसने श्रीलंकेला कचठेवू बेट दिले. काँग्रेस सत्तेत असेपर्यंत देशाची सुरक्षा धोक्यात होती. ते हिमालयाचा सौदा करायलाही मागे-पुढे पाहणार नाहीत. गुजरातच्या किनारी भागात अनेक बेटे आहेत, जिथे कोणीही राहत नाही. काँग्रेस अशा बेटांचाही सौदा करू शकते. गुजरातबाबत काँग्रेसच्या मनात जो राग आणि द्वेष आहे, काँग्रेस सत्तेत आल्यास देशासाठी आणि गुजरातसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. ते भाजप नेत्यांचे फेक व्हिडिओ बनवतात. प्रेमाच्या दुकानात उघडपणे खोटं काम करतात, अशी टीकाही नरेंद्र मोदींनी यावेळी केली. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस