शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

महागाई अन् बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून जनता मोदी सरकारवर नाराज, धक्कादायक आहे सर्व्हेचा निकाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 15:11 IST

Lok Sabha Elections 2024 : पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून नरेद्र मोदी यांना लोकांची पहिली पसंती आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे...

 सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी आपली संपूर्ण ताकद प्रचारासाठी झोकून दिली आहे. यातच लोकनीती सीएसडीएसच्या सर्व्हेमधून धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. दोन टर्म यशस्वीपणे पूर्ण करणारे मोदी सरकार पुन्हा एकदा अर्थात सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे, महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून लोक सरकारवर नाराज असले तरी, ते भाजपच्याच बाजूनेच मतदान करणार असल्याचे सांगत आहेत. हा सर्व्हे 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाच्या 3 आठवडे आधी करण्यात आला आहे.

पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून नरेद्र मोदी यांना लोकांची पहिली पसंती आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे राम मंदिर. याशिवाय, राहुल गांधी यांना पंतप्रधान पदावर पाहू इच्छिनाऱ्यांची संख्या फार कमी असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

एनडीएला 12 टक्क्यांची आघाडी -विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A. च्या तुलनेत तब्बल 12 टक्के लोकांची NDA ला मतदान करण्याची इच्छा आहे. 2019 मध्ये, उत्तर मध्य भारत आणि पश्चिम भारतातील हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात जागा जिंकल्या होत्या. मात्र, दक्षिण भारतात काँग्रेसलाच अधिक जागा मिळाल्या होत्या. यावेळी भाजपची कामगिरी आणखी चांगली होऊ शकते. हिंदी भाषिक राज्यांमध्ये आपली पकड कायम ठेवण्याबरोबरच पक्षाने दक्षिण भारतातही आपला मतदार उभा केला आहे. कर्नाटक वगळता दक्षिण भारतातील इतर राज्यांमध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी काँग्रेसच्या तुलनेत कमी आहे, मात्र, त्यात पूर्वीच्या तुलनेत निश्चितपणे सुधारणा अपेक्षित आहे.

मोदी सरकारचे रिपोर्ट कार्ड -या सर्वेक्षणात ५० टक्क्यांहून अधिक लोकांनी सरकारच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले. तर 40 टक्के लोक सरकारच्या कामावर असमाधानी आहेत. 2019 च्या तुलनेत सरकारच्या कामकाजावर समाधानी असलेल्या लोकांच्या संख्येत 8 टक्क्यांनी घट झाली आहे. बेरोजगारी आणि महागाईबाबत लोक सरकारवर नाराज असून गरीब लोकांमध्ये अशा लोकांची संख्या अधिक आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rajasthanराजस्थानNarendra Modiनरेंद्र मोदीNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी