पंतप्रधान मोदींच्या १५५ सभा, २ हजारहून अधिक वेळा उच्चारले हे २ शब्द; विरोधकांना या ५ मुद्द्यांवर घेरलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 04:36 PM2024-06-01T16:36:38+5:302024-06-01T16:38:07+5:30
"मार्चनंतरच्या आपल्या १५५ प्रचार सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल २९४२ वेळा 'काँग्रेस' शब्दाचा वापर केला. तर २८६२ वेळा..."
लोकसभा निवडणूक २०२४ मधील पंतप्रधान नेरंद्र मोदी यांच्या भाषणांचे विश्लेषण करून काँग्रेसने भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान मोदींनी गेल्या १५ दिवसांच्या प्रचारसभांमध्ये ‘मंदिर’ ४२१ वेळा उच्चारला, ‘मोदी’ शब्द ७५८ वेळा उच्चारला. ‘मुसलमान’, ‘पाकिस्तान’ आणि ‘अल्पसंख्यक’ हे शब्द २२ ४ वेळा उच्चारले. याशिवाय, २३२ वेळा काँग्रेसचा उल्लेख केला, तर ५७३ वेळा I.N.D.I.A. आणि विरोधीपक्षांचा उल्लेख केला. मात्र महंगाई आणि बेरोजगारीसंदर्भात एकदाही भाष्य केले नाही. यावरून स्पष्ट होते की, त्यांनी महत्वाचे मुद्दे बाजूला ठेवले आणि प्रचारात केवळ स्वतःविषयीच बोलले,' असा दावा काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. तर जाणून घेऊयात त्यांच्या १५५ सभांसंदर्भात...
पंतप्रधान मोदींनी हजारोवेळा वापरले हे दोन शब्द -
'क्विंट'च्या एका वृत्तानुसार, मार्चनंतरच्या आपल्या १५५ प्रचार सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल २९४२ वेळा 'काँग्रेस' शब्दाचा वापर केला. तर २८६२ वेळा स्वतः आपल्या नावाचा अर्थात 'मोदी' शब्दाचा वापर केला.
कोणत्या शब्दाचा कितीवेळा केला वापर? -
काँग्रेस: २९४२
मोदी: २८६२
खराब: ९ ४९
SC/ST/OBC: ७८०
विकास: ६३३
इंडिया ब्लॉक: ५१८
मोदीची गॅरंटी: ३४२
भ्रष्टाचार: ३४१
मुसलमान: २८६
महिला: २४४
राम मंदिर: २४४
विकसित भारत: ११९
पाकिस्तान: १०४
घराणेशाही: ९१
नोकऱ्या: ५३
विरोधी पक्ष: ३५
आत्मनिर्भर भारत: २३
अमृत काळ: ४
या ५ मुद्द्यांवर विरोधकांना घेरलं? -
आणखी एका विश्लेषणानुसार, 'काँग्रेसमधील घराणेशाही', 'पाकिस्तान', 'भ्रष्टाचार', 'वारसा कर' आणि 'मोदीची गॅरंटी' या पाच शब्दांच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षासह संपूर्ण I.N.D.I.A. ला आपल्या जाळ्यात अडकवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यातील भाषणांवर नजर टाकली, तर त्यांनी प्रत्येक टप्प्यात नव-नवीन मुद्दे उपस्थित केल्याचे दिसते आणि विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. मात्र त्यांचे हे चक्रव्यूह भेदण्यात विरोधकांना किती यश आले? हे चार जूनला स्पष्ट होईल.
महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ३८, दुसऱ्या टप्प्यात १६, तिसऱ्या टप्प्यात ३६, चौथ्या टप्प्यात १८, पाचव्या टप्प्यात १८, सहाव्या टप्प्यात १९ आणि सातव्या टप्प्यात १० रॅली, प्रचारसभा घेतल्या.
भाजपचा पलटवार -
काँग्रेसच्या या पत्रकार परिषदेवर भाजप नेत्यांनी पलटवार करत, काँग्रेस अशा गोष्टी बोलून आपली हताशा आणि निराशा लपवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण जनतेने पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.