Rahul Gandhi : "मोदींच्या राजवटीत रेल्वे प्रवास ही शिक्षा बनलीय"; 'तो' Video शेअर करत राहुल गांधींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 01:19 PM2024-04-21T13:19:06+5:302024-04-21T13:27:57+5:30
Lok Sabha Elections 2024 Rahul Gandhi And Narendra Modi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ट्रेनच्या डब्यात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
"नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत 'रेल्वे प्रवास' ही शिक्षा बनली आहे! सर्वसामान्यांच्या ट्रेनमधून जनरल डबे कमी करून केवळ 'एलिट ट्रेन्स'चा प्रचार करणाऱ्या मोदी सरकारच्या कारकिर्दीत प्रत्येक श्रेणीतील प्रवाशांचा छळ होत आहे. सोबतच लोक कन्फर्म तिकीट असूनही सामान्य लोकांना त्यांच्या जागेवर आरामात बसता येत नाही, त्यांना जमिनीवर आणि शौचालयात बसून लपून प्रवास करावा लागतो."
नरेंद्र मोदी के राज में ‘रेल का सफर’ सज़ा बन गया है!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 21, 2024
आम आदमी की ट्रेनों से जनरल डिब्बे कम कर सिर्फ ‘एलीट ट्रेनों’ का प्रचार कर रही मोदी सरकार में हर वर्ग का यात्री प्रताड़ित हो रहा है।
लोग कन्फर्म टिकट लेकर भी अपनी सीट पर चैन से बैठ नहीं पा रहे, आम आदमी ज़मीन पर और टॉयलेट में… pic.twitter.com/BYLWPB7j37
"मोदी सरकारला आपल्या धोरणांनी रेल्वे कमकुवत करून तिला अयोग्य सिद्ध करायचे आहे, जेणेकरून ती आपल्या मित्रांना विकण्याचे निमित्त मिळू शकेल. जर सामान्य माणसाची ही सवारी वाचवायची असेल तर रेल्वेला उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न करणाऱ्या मोदी सरकारला हटवावं लागेल" असं म्हणत राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ट्रेनच्या डब्यात प्रचंड गर्दी असून काही प्रवासी टॉयलेटमध्ये बसून प्रवास करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ज्या ट्रेनचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे तो ट्रेनचा डबा केरळ एक्सप्रेसचा असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांना खाली बसून प्रवास करावा लागत आहे.