Rahul Gandhi : "मोदी घाबरलेत, स्टेजवरच त्यांच्या डोळ्यात अश्रू..."; राहुल गांधींचा पंतप्रधानांना खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 04:32 PM2024-04-26T16:32:03+5:302024-04-26T16:39:55+5:30
Lok Sabha Elections 2024 Rahul Gandhi And Narendra Modi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकातील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी देशभरात मतदान होत आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकातील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. कर्नाटकातील विजापूर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, "आजकाल पंतप्रधान मोदी भाषणात खूप घाबरलेले दिसतात. कदाचित येत्या काही दिवसांत स्टेजवरच त्यांच्या डोळ्यात अश्रू येतील."
"पंतप्रधान मोदी 24 तास तुमचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतात. एक दिवस ते पाकिस्तान आणि चीनबद्दल बोलतील. एखाद्या दिवशी ते तुम्हाला थाळी वाजवायला सांगतील आणि तुमच्या मोबाईलचा फ्लॅश लाईट चालू करायला देखील सांगतील. नरेंद्र मोदीजींनी गेल्या दहा वर्षांत गरिबांचे पैसेच हिसकावले आहेत. देशातील 70 कोटी जनतेकडे जेवढा पैसा आहे तेवढाच पैसा त्यांनी देशातील 22 लोकांना दिला."
नरेंद्र मोदी जी ने पिछले 10 साल में 20-25 लोगों को अरबपति बनाया है।
— Congress (@INCIndia) April 26, 2024
उन्होंने एयरपोर्ट-पोर्ट, बिजली, खदान, सोलर-विंड पॉवर, डिफेंस सेक्टर.. सब कुछ अडानी और उनके जैसे अरबपतियों को सौंप दिया है।
लेकिन गरीबों को कुछ नहीं दिया।
कर्नाटक में कांग्रेस पार्टी ने जो भी गारंटियां दी थीं..… pic.twitter.com/tH4TjqtUwT
"भारतात 40 टक्के संपत्ती नियंत्रित करणारे एक टक्के लोक आहेत. त्यामुळे बेरोजगारी, महागाई हटवून काँग्रेस पक्ष तुम्हाला सहभाग देईल. नरेंद्र मोदीजींनी अब्जाधीशांना जेवढा पैसा दिला आहे तेवढाच पैसा आम्ही भारतातील गरिबांना देऊ. नरेंद्र मोदीजींनी गेल्या 10 वर्षात 20-25 लोकांना अब्जाधीश बनवले आहे. त्यांनी विमानतळ-बंदर, वीज, खाणी, सौर-पवन ऊर्जा, संरक्षण क्षेत्रात काम केले. सर्व काही अदानी आणि त्यांच्यासारख्या अब्जाधीशांच्या हाती सोपवण्यात आले आहे. मात्र गरिबांना काहीच दिले नाही."
"कर्नाटकात काँग्रेस पक्षाकडून जी काही आश्वासनं देण्यात आली. ती पूर्ण झाली आहे. तुमच्या टाळ्या हा त्याचा पुरावा आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं. कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथील अनेकल येथे मतदान केंद्राबाहेर गोंधळ झाला. येथे काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. मात्र, घटनेनंतर काही वेळातच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. येथील बूथबाहेर काही कार्यकर्ते मते मागण्यासाठी आले होते, असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.