पीएम नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची सभा; काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 05:03 PM2024-05-27T17:03:56+5:302024-05-27T17:04:19+5:30
Rahul Gandhi Rally In Varanasi: लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात मतदान होणार आहे.
Rahul Gandhi In Varanasi: लोकसभा निवडणुकीच्या सातव्या अन् शेवटच्या टप्प्यासाठी येत्या 1 जून रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातही मतदान होईल. तत्पूर्वी भाजपच्या या बालेकिल्ल्यात काँग्रेसची जाहीर सभा होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या मंगळवारी (28 मे) समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबत वाराणसीत प्रचारसभा घेणार आहेत.
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
याबाबत माहिती देताना वाराणसी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अजय राय म्हणाले की, "उद्या राहुल गांधी यांची वाराणसीत जाहीर सभा होणार आहे. यासाठी राहुल गांधी आणि अखिलेश यादव दुपारी 4 वाजता मोहनसराय येथून रॅलीला सुरुवात करतील. याच भागात मोदी सरकारने शेतकऱ्यांव लाठीचार्ज केला होता. सातव्या टप्प्यात परिवर्तनाची लाट इथून संपूर्ण देशात, राज्यात आणि विशेषत: बनारसमध्ये उठेल."
राहुल-अखिलेश यांच्या रॅलीत चेंगराचेंगरी
दरम्यान, राहुल गांधी आणि अखिलेश यादव सभेसाठी प्रयागराज येथे आले होते. यावेळी दोन नेत्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला आणि बॅरिकेड्स तोडून स्टेजजवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. यानंतर दोन्ही नेते रॅलीला संबोधित न करताच तेथून निघून गेले. आता वाराणसीमध्ये याबाबत खबरदारी घेतली जात आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी योग्य पावले उचलली जात असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.
राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या पक्षाला किती जागा मिळतील? अमित शाहंनी केली भविष्यवाणी