नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश असलेल्या भारतातील लोकसभा निवडणुकांच्या १९ एप्रिल रोजी सुरू झालेल्या उत्सवाचा शेवटचा म्हणजे सातवा टप्पा शनिवारी पार पडला.
आठ राज्यांतील ५७ लोकसभा जागांसाठी या टप्प्यात सरासरी सुमारे ६१.७७ टक्के मतदान नाेंदविण्यात आले. सातव्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये संदेशखाली भागामध्ये तृणमूल काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी हाणामारी झाली तर या राज्याच्या अन्य भागांतही हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या.
पंजाबमधील सर्व १३ जागांवर या टप्प्यात मतदान झाले. त्याशिवाय ओडिशा विधानसभेच्या उर्वरित ४२ जागा तसेच हिमाचल प्रदेशातील सहा विधानसभा जागांसाठी देखील शनिवारी मतदान पार पडले.
सातव्या टप्प्यातील मतदानझारखंड ७०.६६%उत्तर प्रदेश ५५.५९%पश्चिम बंगाल ७३.३६%हिमाचल प्रदेश ६९.७३%बिहार ५१.९२%पंजाब ५८.९५%ओडिशा ७०.६७%चंडीगड ६७.९०%आकडे रात्री १२.०० वाजेपर्यंत
सहा टप्प्यांचे मतदानपहिला टप्पा ६६.१४%दुसरा टप्पा ६६.७१%तिसरा टप्पा ६५.६८%चौथा टप्पा ६९.१६%पाचवा टप्पा ६२.२%सहावा टप्पा ६३.३६%