शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

लोकसभेच्या १०५ जागांवर भाजपचा पराभव करणे विरोधकांना कठीण, पाहा आकडेवारी काय सांगते?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 10:00 AM

आगामी लोकसभा निवडणूक 'एनडीए' विरोधात 'इंडिया' अशी होणार, हे स्पष्ट झाले आहे.

आगामी म्हणजेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष जोरदार तयारी करीत आहेत. २०२४ ची निवडणूक जिंकण्यासाठी  भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) गेल्या मंगळवारी दिल्लीत ३८ घटक पक्षांची बैठक घेत शक्तिप्रदर्शन केले होते. तर दुसरीककडे २६ विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनीही त्याच दिवशी बंगळुरू येथे आयोजित केलेल्या बैठकीत भाजपला कसे पराभूत करावयाचे, यावर विचारमंथन केले. 

या बैठकीत विरोधकांनी आपल्या आघाडीला 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायंस' (इंडिया) असे नाव दिले आहे. त्यामुळे आगामी लोकसभानिवडणूक 'एनडीए' विरोधात 'इंडिया' अशी होणार, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, या सगळ्यामध्ये मागील २०१९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमधील आकडेवारीवर एक नजर टाकली असता, यावरून विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या 'इंडिया'साठी ही आकडेवारी मोठे आव्हान म्हणता येईल. 

मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हे आकडे कितपत प्रभावी ठरतील, यावर काहीही सांगणे आता तरी घाईचे ठरेल. परंतू या आकडेवारीवरून भाजपची ताकद किती आहे, याचा अंदाज लावता येईल. द प्रिंटमधील वृत्तानुसार, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्ष भाजपने तीन लाखांहून अधिक मतांच्या फरकाने १०५ जागा जिंकल्या होत्या. भाजपचा हा विजय २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्याच मतांच्या फरकाने मिळविलेल्या जागांपेक्षा ६३ जास्त होता.

दोन लाख मतांच्या फरकाने विजयी झालेल्या २३६ खासदारांपैकी १६४ फक्त भाजपचे होते २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दोन लाख मतांच्या फरकाने विजयी झालेल्या २३६ खासदारांपैकी १६४ फक्त भाजपचे होते. दुसरीकडे, तीन लाख मतांच्या फरकाने विजयी झालेल्या १३१ खासदारांपैकी १०५ भाजपचे होते. उर्वरित २६ खासदारांपैकी १० द्रमुकचे आणि पाच काँग्रेसचे होते. भाजपच्या उमेदवारांनी ४ लाखांहून अधिक मतांच्या फरकाने ४४ जागा जिंकल्या होत्या. एवढेच नाही तर पक्षाचे १५ खासदार होते, जे ५ लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता.

भाजपकडून मिळणार कडवे आव्हान? लोकशाहीत विजय-पराजयावर कोणाचेही नियंत्रण नसते, पण ही आकडेवारी पाहता या जागांवर भाजपला टक्कर देणे विरोधी आघाडी 'इंडिया'साठी सोपे जाणार नाही, असे सहज म्हणता येईल. या सर्व जागांवर विरोधकांना आगामी निवडणुकीत भाजपकडून कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभेच्या या १०५ जागांवर भाजपला पराभूत करणे विरोधकांना अशक्यप्राय वाटते, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. 

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक