राजेश शेगाेकार, लोकमत न्यूज नेटवर्कपाटणा : सलग दाेन वेळा विजय मिळविणारे जेडीयुचे संताेषकुमार कुशवाह यांच्या प्रभावाची, जेडीयु साेडून राजदच्या तिकिटावर उभा असलेल्या बीमा भारती यांची सलग पाच वेळा आमदारकीची प्रतिष्ठा अन् जन अधिकार पार्टी काॅंग्रेसमध्येविलीन करूनही उमेदवारीपासून वंचित राहिलेल्या राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांच्या अस्तित्वाच्या लढाईचा तिरंगी सामना पूर्णीया मतदारसंघात हाेत आहे. कुशवाहांसाठी स्व:ता माेदींनी सभा घेतली. लालु प्रसाद यादव यांनी पप्पू यादवांचा गेम केल्यानंतर बिमा भारतींच्या अर्ज दाखल करण्यापासून तेजस्वी यादव येथे सक्रीय आहेत. पप्पू यादव यांच्या बंडामुळे काॅंग्रेसमध्ये मतविभाजन अटळ मानेल जाते त्यामुळे यादव, मुस्लीम मतांवर राजद डाेळा असून भाजप व जेडीयूची मतपेढी एनडीएची ताकद आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
- पप्पू यादव यांनी पुर्णीयाचा बेटा असा अस्मितेचा प्रश्न उभा केला असून त्यांची उमेदवारीचा फटका किती यावर निकाल ठरेल.
- मागासवर्गीयांची मतपेढी जेडीयु व भाजप कायम ठेवणार की बिमा भारती नुकसान पाेहचविणार
- येथील रस्ते, राेजगारासह गेल्या आठ वर्षापासून कागदावरच असलेले विमातळ चर्चेत आहे. पंतप्रधानांनी या सुविधांचे दिलेले आश्वासन महत्वाचे ठरू शकते.
२०१९ मध्ये काय घडले ?संताेषकुमार जेडीयु (विजयी) ६,३२,९२४ उदय सिंह काॅंग्रेस ३,६९,४६३