नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा अंतिम टप्पा संपल्यानंतर रविवारी संध्याकाळी एक्झिट पोल जारी करण्यात आले. यातील अनेक एक्झिट पोलमधून एनडीएला बहुमत मिळत असल्याचं दाखवण्यात आलं. या निवडणुकीत पश्चिम बंगाल फार चर्चेत राहिलं. भाजपानंही पश्चिम बंगालवर विशेष लक्ष दिलं होतं. एनडीटीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाला 24 जागा मिळू शकतात. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण 42 जागा आहेत. यंदा भाजपाला पश्चिम बंगालमध्ये 24 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस एक ते दोन जागांवर विजयी होईल. एक्झिट पोलचे निकाल समोर येताच भाजपाचे राष्ट्रीय महासचिव राम माधव म्हणाले, बंगालमधल्या निवडणूक पंडितांना तिकडचे निकाल हैराण करणारे असतील.
'2014तल्या यूपी निकालांसारखे यंदा बंगालमध्ये धक्कादायक निकाल लागतील'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 4:21 PM