शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
3
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
5
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
6
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
7
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
8
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
9
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
10
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
11
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
12
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
13
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
14
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
15
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
16
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
17
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
18
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
19
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
20
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल

शिवसेनेला पुन्हा हुलकावणी; YSR किंवा BJD ला मिळणार लोकसभा उपाध्यक्षपदाची 'बक्षिसी'?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 1:19 PM

मोदी सरकारचं संसदीय अधिवेशन 17 जून रोजी सुरू झालं असून, 26 जुलैपर्यंत चालणार आहे.

नवी दिल्लीः मोदी सरकारचं संसदीय अधिवेशन 17 जून रोजी सुरू झालं असून, 26 जुलैपर्यंत चालणार आहे. याचदरम्यान मोदी सरकार स्वतःच्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प मांडणार आहे. यापूर्वीच लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड करावी लागते, 17व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून राजस्थानमधील खासदार ओम बिर्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदासाठी YSR, शिवसेना की BJD या पक्षांच्या नेत्यांची चर्चा आहे. लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर एनडीएचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनं दावा केला आहे. परंतु मोदी सरकार एनडीएच्या बाहेरच्या पक्षाला हे पद देऊ इच्छिते. शिवसेनेचे 18 खासदार असूनही त्यांच्या वाट्याला फक्त एकच कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. एनडीएमध्ये भाजपानंतर सर्वाधिक खासदार हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे साहजिकच लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर शिवसेनेनं दावा केला आहे. ती आमची मागणी नाही, तर तो आमचा नैसर्गिक अधिकार आहे. लोकसभेचे उपाध्यक्षपद हे आम्हालाच मिळालं पाहिजे, असंही संजय राऊतांनी सांगितलं होतं.तर दुसरीकडे हे पद शिवसेनेच्या वाट्याला आल्यास भावना गवळींना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजपानं या पदासाठी वायएसआर काँग्रेसला ऑफर दिल्याची चर्चा होती. त्यानंतर आता नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दलाला हे पद मिळण्याची शक्यता आहे. भाजपा बीजेडीला हे पद देऊन ओडिशातला आपला प्रभाव वाढवण्याचा विचार करत आहे.17व्या लोकसभेचे अध्यक्ष बनण्यासाठी ओम बिर्ला यांना शिवसेना (Shiv Sena), अकाली दल (Akali Dal), नॅशनल पीपल्स पार्टी (National People's Party), मिझो नॅशनल फ्रंट (Mizo National Front), एलजेपी (Lok Janshakti Party), वायएसआर काँग्रेस (YSRCP), जेडीयू (Janta Dal United), अण्णा द्रमुक (AIADMK), अपना दल (APNA DAL)आणि बीजेडी (Biju Janata Dal) या 10 पक्षांनी समर्थन दिलं आहे. बीजेडीनं लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी दिलेल्या समर्थनाची परतफेड करण्यासाठीसुद्धा बीजेडीला लोकसभेचं उपाध्यक्षपद देण्यास भाजपा इच्छुक आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBiju Janata Dalबिजू जनता दल