04 Jun, 24 07:36 PM
नरेंद्र मोदी यांच्यावरील लोकांच्या अतूट विश्वासाचे हे प्रतिबिंब - अमित शाह
"एनडीएचा हा विजय देशासाठी बलिदान देणाऱ्या नेत्यामुळेच आहे. नरेंद्र मोदी यांच्यावरील लोकांच्या अतूट विश्वासाचे ते प्रतिबिंब आहे. मोदींच्या विकसित भारताच्या व्हिजनवर जनतेचा हा विश्वास आहे. हा सार्वजनिक आशीर्वाद म्हणजे मोदींच्या गरीब कल्याण, वारशाचे पुनरुज्जीवन, महिलांचा स्वाभिमान आणि शेतकरी कल्याणाच्या कामाच्या यशाचा आशीर्वाद आहे. या जनादेशाने विकासाच्या प्रवासाला आणखी गती आणि बळ देण्यासाठी नवा भारत तयार आहे," असे अमित शाह यांनी म्हटलं आहे.
04 Jun, 24 07:25 PM
देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा एनडीएवर विश्वास व्यक्त केला - नरेंद्र मोदी
"देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा एनडीएवर विश्वास व्यक्त केला आहे. भारताच्या इतिहासातील हा अभूतपूर्व क्षण आहे. या प्रेम आणि आशीर्वादासाठी मी माझ्या कुटुंबियांना प्रणाम करतो. मी देशवासियांना खात्री देतो की त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही नवीन ऊर्जा, नवीन उत्साह आणि नवीन संकल्प घेऊन पुढे जाऊ. मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या समर्पण आणि अथक परिश्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो," अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी दिली.
04 Jun, 24 06:48 PM
लोकांना वाटले म्हणून त्यांनी माझा पराभव केला - अधीर रंजन चौधरी
"मला जनतेचे आशीर्वाद ५ वेळा मिळाले आहेत आणि मी येथून विजयी झालो. यावेळी लोकांना पराभव करण्याची गरज आहे असे वाटले त्यामुळे त्यांनी माझा पराभव केला. मला कोणताही आरोप करायचा नाही. युसूफ पठाण माझा पराभव करून ते इथून जिंकले आहेत, मी त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो," असे बहारमपूर येथील काँग्रेसचे उमेदवार अधीर रंजन चौधरी म्हणाले.
04 Jun, 24 06:41 PM
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे आभार मानते - ममता बॅनर्जी
"मी अखिलेश यादव यांचे आभार मानले आहेत, येत्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात फक्त अखिलेश यादवच विजयी होतील. बिहारच्या निकालात तथ्य नाही, मी तेजस्वी यादव यांच्याशी बोललो आहे. आता मतमोजणी सुरू आहे. मी शरद पवार, उद्धव ठाकरे, कल्पना सोरेन आणि सुनीता केजरीवाल यांचे आभार मानले आहेत," असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.
04 Jun, 24 06:10 PM
आम्ही सीबीआय-ईडीच्या विरोधात निवडणूक लढलो - राहुल गांधी
"इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्षाने ही निवडणूक फक्त एका राजकीय पक्षाविरुद्ध लढवली नाही. आम्ही ही निवडणूक भाजप, हिंदुस्थानची संघटना, सीबीआय-ईडी या सर्वांच्या विरोधात लढलो. कारण या तपास यंत्रणांना नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी घाबरवले होते आणि धमकावले होते. पण हा लढा होता संविधान वाचवण्यासाठी," असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
04 Jun, 24 06:04 PM
भाजपने एका व्यक्तीच्या तोंडावर मते मागितली - मल्लिकार्जून खरगे
"आज आलेले निकाल हा जनतेचा आणि लोकशाहीचा विजय आहे. ही लढत मोदी विरुद्ध जनता अशी आम्ही आधीच म्हणत होतो. यावेळी जनतेने कोणत्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत न देता सत्ताधारी पक्ष भाजपने एका व्यक्तीच्या तोंडावर मते मागितली. आज हे स्पष्ट झाले आहे की हा जनादेश नरेंद्र मोदींच्या विरोधात आहे, हा त्यांचा नैतिक पराभव आहे," असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी म्हटलं आहे.
04 Jun, 24 05:48 PM
वाराणसीत तिसऱ्यांदा खुलले कमळ; नरेंद्र मोदींचा मोठा विजय
वाराणसी लोकसभा मतदारसंघातून नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. दीड लाख मतांच्या फरकाने नरेंद्र मोदी विजयी झाले आहेत. मोदींनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला.
04 Jun, 24 05:09 PM
कर्नाटकातील गुलबर्गा मतदारसंघातून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे जावई राधाकृष्ण दोड्डामणी २७,२०५ मतांनी विजयी झाले.
04 Jun, 24 05:08 PM
चंद्रशेखर यांनी यूपीच्या नगीना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. निवडणूक अधिकारी अंकित अग्रवाल यांनी चंद्रशेखर यांना विजयाचे प्रमाणपत्र दिले आहे.
04 Jun, 24 04:32 PM
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बसवराज बोम्मई यांनी हावेरी मतदारसंघातून निवडणुकीत आघाडीवर आहे. ०७,०५,५३८ मते मिळाली आहेत.
04 Jun, 24 04:22 PM
उत्तर प्रदेशात पिछाडीवर गेलेल्या काँग्रेसला या निवडणुकांमध्ये बळ मिळाले असून, लोकसभेच्या सात जागांवर पक्ष आघाडीवर आहे. सहारनपूर, अमरोहा, सीतापूर, रायबरेली, अमेठी, अलाहाबाद आणि बाराबंकी या जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.
04 Jun, 24 04:10 PM
लोकसभा निवडणुकीच्या कलांनंतर आता निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या एनडीए २९५ जागांवर पुढे आहे. इंडिया आघाडी २३१ जागांवर आघाडीवर आहे. इतर १७ जागांवर आघाडीवर आहेत.
04 Jun, 24 04:02 PM
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे राजस्थानमधील कोटा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. काँग्रेसचे प्रल्हाद गुंजाल पिछाडीवर आहेत.
04 Jun, 24 03:50 PM
लोकसभा निवडणुकीत एनडीएने बहुमताचा आकडा पार केला आहे. गेल्या वेळी जागांची संख्या कमी होताना दिसत आहे. एनडीए अजूनही २९२ जागांवर आघाडीवर आहे. भाजपा दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात विजयोत्सव साजरा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाच्या प्रमुख नेत्यांसह सायंकाळी ७ वाजता भाजपा कार्यालयात पोहोचतील आणि कार्यकर्त्यांना संबोधित करतील.
04 Jun, 24 03:39 PM
मणिपूरमधील दोन्ही लोकसभा जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. सत्ताधारी भाजपाला धक्का आहे.
04 Jun, 24 03:33 PM
लोकसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू असून, हळूहळू चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये भविष्यातील रणनीतीबाबत चर्चा झाली.
04 Jun, 24 03:00 PM
पश्चिम बंगालमध्ये भाजपा पिछाडीवर
पश्चिम बंगालमध्ये भाजपाची कामगिरी सर्वोत्तम असेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला होता. मात्र, निकालांच्या कलांनुसार, बंगालमध्ये भाजपा गेल्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीची पुनरावृत्ती करू शकला नाही आणि केवळ ११ जागांवर आघाडीवर आहे. तर टीएमसी ३० जागांवर आघाडीवर आहे. राज्यात काँग्रेस एका जागेवर पुढे आहे.
04 Jun, 24 02:57 PM
कृष्णानगर जागेवर टीएमसी उमेदवार महुआ मोईत्रा ४४ हजार मतांनी आघाडीवर आहेत. युसूफ पठाण हे बहरामपूर मतदारसंघातून अधीर रंजन चौधरी यांच्याही पुढे आहेत. आसनसोल मतदारसंघातून टीएमसीचे शत्रुघ्न सिन्हा पुढे आहेत.
04 Jun, 24 02:54 PM
काँग्रेस नेते राजीव शुक्ला म्हणाले की, लोकांनी भाजपाला नाकारल्याचे कलांनुसार स्पष्ट झाले आहे. भाजपा २३०-२४० च्या दरम्यान आला आहे. म्हणजेच त्यांना स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यांनी आता प्रयत्न केल्यास कुबड्यांच्या आधारावरील सरकार स्थापन होईल आणि त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागेल.
04 Jun, 24 02:50 PM
वाराणसीत नरेंद्र मोदी १ लाखांहून अधिक मतांनी आघाडीवर
वाराणसीतील मतमोजणीच्या २५व्या फेरीनंतर भाजपाच्या नरेंद्र मोदींना ५५७४८९, काँग्रेसच्या अजय राय यांना ४१२३६२ मते मिळाली आहेत. नरेंद्र मोदी १४५१२७ मतांनी पुढे आहे. तर, गुना लोकसभा जागेवर भाजपाचे ज्योतिरादित्य सिंधिया ४,७७,७७४ मतांनी पुढे आहेत. सिंधिया यांना ८,२१,८७६, काँग्रेसचे यादवेंद्र सिंह यांना ३,४४,१०२ मते मिळाली. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे हैदराबादच्या जागेवर २.१७ लाख मतांनी आघाडीवर आहेत. मणिपूरमधील दोन्ही जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. मिर्झापूरमध्ये अपना दल (एस) उमेदवार अनुप्रिया पटेल ७८५८ मतांनी पुढे आहेत.
04 Jun, 24 02:45 PM
लोकसभा निवडणुकीच्या कलांनुसार, एनडीए आणि इंडिया आघाडीत निकराची लढत पाहायला मिळत आहे. एनडीए २९४ जागांवर, इंडिया आघाडी २३२ जागांवर पुढे आहे. कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. देशात आघाडीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता वाढत आहे.
04 Jun, 24 02:41 PM
निवडणूक आयोगाने अनेक जागांवर विजयी घोषित करण्यास सुरुवात केली आहे. जालंधरमधून काँग्रेसचे चरणजीत सिंह चन्नी विजयी झाले आहेत. जयपूरमधून भाजपाच्या मंजू शर्मा विजयी झाल्या आहेत.
04 Jun, 24 02:13 PM
उत्तर प्रदेशात भाजपाला मोठा धक्का
उत्तर प्रदेशात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. सपा ३७ जागांवर आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशातील संभल मतदारसंघातून सपाचे झिया उर रहमान आघाडीवर आहेत. भाजपाचे परमेश्वर लाल सैनी सुमारे १३ हजार मतांनी मागे आहेत.
04 Jun, 24 02:10 PM
इंदूरमध्ये एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. या ठिकाणी NOTA ला २ लाख मते मिळाली. काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली होती. त्यानंतर काँग्रेसने कोणालाही पाठिंबा दिला नाही आणि सांगितले की, जनतेकडे NOTA चा पर्याय आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करणाऱ्यांपैकी अनेकांनी NOTA चा पर्याय निवडल्याचे मानले जात आहे.
04 Jun, 24 01:55 PM
टीडीपीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोघांनी टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांना केला फोन.
04 Jun, 24 01:40 PM
अमेठीत स्मृती इराणी ६२ हजार मतांनी पिछाडीवर
अमेठीमध्ये काँग्रेसचे किशोरीलाल शर्मा आघाडीवर आहेत. भाजपाच्या स्मृती इराणी ६२ हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर आहेत. दुसरीकडे, तामिळनाडूमध्ये द्रमुकने आघाडी कायम ठेवली आहे. या ठिकाणी भाजपाची पिछेहाट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
04 Jun, 24 01:38 PM
केंद्रीय गृहमंत्री आणि गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार अमित शाह ४,८८,२५० मतांच्या फरकाने आघाडीवर आहेत.
04 Jun, 24 01:12 PM
अशोक गेहलोत यांचे पुत्र पिछाडीवर, भाजपाचे उमेदारांची मोठी आघाडी
जालोरमधून काँग्रेसचे उमेदवार आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत येथे १,५८,४४८ मतांनी पिछाडीवर आहेत. मतमोजणी सुरू आहे. भाजपाचे उमेदवार लुंबाराम येथे आघाडीवर आहेत.
04 Jun, 24 01:10 PM
रायबरेलीतील भाजपा उमदेवाराने पराभव स्वीकारला
रायबरेलीमध्ये भाजपाचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांनी निवडणुकीतील पराभव स्वीकारत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये दिनेश प्रताप सिंह म्हणाले की, रायबरेलीच्या देवतुल्य लोकांची सेवा मोठ्या नम्रतेने आणि मेहनतीने केली. तरीही माझ्या सेवेदरम्यान माझ्या विचारात, शब्दात किंवा कृतीत काही चूक झाली असेल किंवा कुणाला त्रास झाला असेल तर आम्ही रायबरेलीच्या जनतेची माफी मागतो.
04 Jun, 24 01:06 PM
भाजपाचे के. अन्नामलाई कोईम्बतूरमध्ये पिछाडीवर
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीनंतर तामिळनाडू भाजपाचे प्रदेशाध्यभ के. अन्नामलाई कोईम्बतूरमध्ये पिछाडीवर आहेत. डीएमकेचे गणपती राजकुमार यांना ८००४०, अन्नामलाई यांना ६१०३५ आणि AIADMKच्या सिंगाई रामचंद्रन यांना ३३८८३ मते मिळाली आहेत. तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरमधील पीडीपी प्रमुख आणि अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मेहबुबा मुफ्ती पिछाडीवर आहेत.
04 Jun, 24 01:03 PM
हासन येथील निकालांवर समाधानी नाही: कुमारस्वामी
जेडी(एस) ला आम्हाला जे अपेक्षित होते तेच निकाल मिळाले. पण हासनच्या निकालावर मी समाधानी नाही. एकंदरीत कर्नाटकात आम्ही ४-५ जागा जिंकू शकलो असतो, पण आमच्या चुकांमुळे आम्ही ४-५ पेक्षा जास्त जागा गमावल्या. कर्नाटकात जेडीएसचे अस्तित्व टिकून असल्याचे लोकांनी काँग्रेसला दाखवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया जेडी(एस) नेते एचडी कुमारस्वामी यांनी दिली. सुरुवातीच्या कलांनुसार, पक्षाचे खासदार आणि हसनचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना २२,६९८ मतांच्या फरकाने पिछाडीवर आहेत. तेथे मतमोजणी सुरू आहे.
04 Jun, 24 01:00 PM
छिंदवाडा येथून कमलनाथ यांनी पराभव स्वीकारला
छिंदवाडामध्ये भाजपाचे विवेक बंटी साहू यांच्या निर्णायक आघाडीनंतर माजी मुख्यमंत्री कमलनाथ काँग्रेस कार्यालयातून बाहेर पडले. कमलनाथ म्हणाले की, छिंदवाड्यातील जनतेने दिलेला निर्णय मान्य आहे. देशात घेतलेल्या निर्णयाचा चांगला परिणाम आहे. इंडिया आघाडीने इतर पक्षांसोबत आघाडी करून सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करावा. भाजपने आधी ४०० नव्हे तर २३० चा आकडा पार करावा.
04 Jun, 24 12:46 PM
लोकांच्या सेवेसाठी तत्परतेने काम करेन: कंगना रणौत
हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार कंगना रणौत यांनी आघाडी घेतली आहे. हे माझे जन्मस्थान आहे आणि येथील लोकांची सेवा करण्यास तत्पर आहे. नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास यामध्ये माझेही योगदान असेल.
04 Jun, 24 12:40 PM
सपा आणि भाजपाचे कार्यकर्ते आमनेसामने
लखनौमध्ये रमाबाई आंबेडकर मतमोजणीच्या ठिकाणी सपा आणि भाजपा समर्थक आमनेसामने आल्याची माहिती देण्यात आली आहे. सुरुवातीला दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर पुढे वाद वाढला. या घटनेत समाजवादी पक्षाचा एक कार्यकर्ता जखमी झाला असून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
04 Jun, 24 12:26 PM
तेलंगणात भाजपा आठ जागांवर आघाडीवर
तेलंगणात भाजपाच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभेच्या आठ जागांवर भाजपा पक्ष आघाडीवर आहे. काँग्रेस आठ जागांवर पुढे आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे हैदराबादच्या जागेवर आघाडीवर आहेत.
04 Jun, 24 12:24 PM
इंदूरमध्ये NOTA ला ९६ हजार मते
इंदूरमधील मतदारांनी नोटा पर्याय मोठ्या प्रमाणात स्वीकारल्याचे पाहायला मिळत आहे. येथे NOTA दुसऱ्या स्थानावर असून, NOTA ला ९६ हजार मते मिळाली आहेत. येथील भाजपा उमेदवार शंकर लालवानी यांनी आघाडी घेतली आहे.
04 Jun, 24 12:20 PM
भाजपा २४० जागांसह सर्वांत देशात मोठी झेप, इंडिया आघाडीला २२७ जागांवर पुढे
लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या आतापर्यंत आलेल्या कलांनुसार, भाजप २४०, टीडीपी १६, जेडीयू १४, शिवसेना ६, एलजेपीआरव्ही ५, जेडीएस ३, जेएसपी २, आरएलडी २, एजेपी १, एजेएसयूपी १, एनसीपी १, एचएएम १ जागेवर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडीत काँग्रेस ९५, सीपीआय ३, शरद पवार गट ८, सीपीएम ६, आप ३, एसपी ३४, टीएमसी २८, आरजेडी ५, आययूएमएल ३, डीएमके २१, जेएमएम २ जागांवर आघाडीवर आहे. एनडीए एकूण २९७ जागांवर, तर इंडिया आघाडी २२७ जागांवर पुढे आहे.
04 Jun, 24 12:15 PM
पश्चिम बंगालमध्ये शत्रूघ्न सिन्हा आघाडीवर
पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले ज्येष्ठ अभिनेते शत्रूघ्न सिन्हा २६ हजार १९७ मतांनी आघाडीवर आहेत.
04 Jun, 24 11:36 AM
NDA आणि INDIA मध्ये चुरशीची लढत
सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये NDA आणि INDIA यांच्यात चुरशीची लढत दिसत आहे. सकाळच्या काही तासांच्या कलानंतर NDA ची २९७ जागांवर आघाडीवर आहे, INDIA आघाडी २२७ जागांवर पुढे आहे. तसेच, १९ जागांवर अपक्षांनी आघाडी घेतली आहे.
04 Jun, 24 11:32 AM
केरळच्या तिरूवनंतरपुरममधून काँग्रेसचे शशी थरूर पिछाडीवर
केरळच्या तिरुवनंतपुरम मतदारसंघातून भाजपचे राजीव चंद्रशेखर ४९०० मतांनी पुढे आहेत. काँग्रेसचे शशी थरूर मागे पडले आहेत.
04 Jun, 24 11:25 AM
ठाण्यातून शिंदे गटाचे नरेश म्हस्के ४२ हजारांनी आघाडीवर
ठाणे लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. येथे शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी जवळपास ४२ हजारांनी आघाडी घेतली आहे.
04 Jun, 24 11:21 AM
मनोहरलाल खट्टर कर्नालमधून २ लाख ५३ हजारांपेक्षा जास्तीने आघाडीवर
हरयाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर कर्नालमधून सुमारे २ लाख ५३ हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहे. येथे काँग्रेसचे उमेदवार मागे पडले आहेत.
04 Jun, 24 11:06 AM
अमेठीतून स्मृती इराणी पिछाडीवर
अमेठीमधून काँग्रेसचे उमेदवार किशोरीलाल शर्मा २३ हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहेत. गतविजेत्या भाजप उमेदवार स्मृती इराणी यांना पिछाडीचा सामना करावा लागत आहे.
04 Jun, 24 10:21 AM
भाजपाचे अभिनेते-अभिनेत्री आघाडीवर
ईशान्य दिल्लीत मनोज तिवारी, हिमाचलच्या मंडीमधून कंगना राणौत तर मथुरेतून हेमा मालिनी यांनी मतमोजणीत आघाडी घेतली आहे.
04 Jun, 24 09:30 AM
राहुल गांधी दोनही मतदारसंघातून आघाडीवर
उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी २१२६ मतांच्या फरकाने आघाडीवर आहेत. तर केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी ८७१८ मतांनी आघाडीवर आहेत.
----
04 Jun, 24 09:25 AM
टीव्हीवरील 'श्रीराम' सुमारे ६ हजार मतांनी पिछाडीवर
रामायण या टीव्ही शो मध्ये प्रभू श्रीरामाची भूमिका करणारे आणि सध्या भाजपाचे उत्तर प्रदेशातील मेरठमधून उमेदवार अरुण गोविल हे ६ हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
04 Jun, 24 09:19 AM
भाजपाचे अभिनेते-अभिनेत्री आघाडीवर
ईशान्य दिल्लीत मनोज तिवारी, हिमाचलच्या मंडीमधून कंगना राणौत तर मथुरेतून हेमा मालिनी यांनी मतमोजणीत आघाडी घेतली आहे.
04 Jun, 24 08:41 AM
मतमोजणी दिवशी सेन्सेक्स ८०,००० पार जाणार?
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोल्स जाहीर करण्यात आले होते. यानंतर सोमवारी कामकाजादरम्यान, शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. आज शेअर बाजारात काय घडेल, जाणून घेऊया.
04 Jun, 24 08:11 AM
मतमोजणीला सुरुवात
लोकसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली. लोकसभेच्या ५४३ पैकी ५४२ जागांवर उमेदवारांच्या भवितव्याचा आज निकाल लागणार आहे. सुरतची जागा भाजपाने बिनविरोध जिंकलेली आहे.
04 Jun, 24 07:58 AM
मध्य प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्हिडी शर्मा यांची जुगल किशोर मंदिरात प्रार्थना
मध्य प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खजुराहो लोकसभा मतदारसंघातील उमेदवार व्हिडी शर्मा यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी पन्ना येथील जुगल किशोर मंदिरात भेट दिली आणि प्रार्थना केली.
04 Jun, 24 07:53 AM
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु होण्याआधीच भाजपाने उघडले विजयाचे खाते
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु होण्याआधीच भाजपाने विजयाचे खाते उघडले. गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल यांनी निवडणूक होण्यापूर्वीच विजय मिळवला. त्यांच्याविरोधातील काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात आला होता. उर्वरित अपक्ष उमेदवारांनीही अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे दलाल बिनविरोध निवडून आल्याचे झाल्याचे घोषित केले होते.