भाजपाला काँग्रेसचा धक्का! लोकसभा निवडणुकीपूर्वीच खासदाराने काँग्रेसमध्ये केला प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 03:59 PM2024-04-02T15:59:27+5:302024-04-02T16:00:51+5:30

लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपाला बिहारमध्ये मोठा झटका बसला आहे. भाजपा खासदार अजय निषाद यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Lok Sabha MP from Muzaffarpur Bihar Ajay Nishad resigned from BJP and joined Congress today | भाजपाला काँग्रेसचा धक्का! लोकसभा निवडणुकीपूर्वीच खासदाराने काँग्रेसमध्ये केला प्रवेश

भाजपाला काँग्रेसचा धक्का! लोकसभा निवडणुकीपूर्वीच खासदाराने काँग्रेसमध्ये केला प्रवेश

लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपाला बिहारमध्ये मोठा झटका बसला आहे. भाजपा खासदार अजय निषाद यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आज मंगळवारी निषाद यांनी दिल्लीत काँग्रेसचे सदस्यत्व स्विकारले. आता काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्ष त्यांना मुझफ्फरपूरमधून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. 

केजरीवाल आत, संजय सिंह बाहेर! दारु घोटाळा: आप खासदारांना मिळाला सहा महिन्यांनी जामिन

त्याचवेळी खासदार अजय निषाद यांनी भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर आपण नेहमीच पक्षाप्रमाणे काम केले आणि भाजपकडून तिकीट मिळाले नाही, असे सांगितले. माझ्याबाबत सर्वेक्षण चांगले नसल्याचे भाजपने म्हटले आहे.

माझ्या तिकीटाबाबत काँग्रेस पक्षाचे नेते निर्णय घेतील आणि मी निवडणूक लढण्यास तयार आहे, असं अजय निषाद म्हणाले.

काँग्रेसने आज उमेदवारांची यादी जाहीर केली

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाने आंध्र प्रदेशातील पाच, बिहारमधील तीन, ओडिशातील आठ आणि बंगालमधील एका जागेवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

वायएस शर्मिला रेड्डी यांना कडप्पा, आंध्र प्रदेशमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर बिहारमधील कटिहारमधून तारिक अन्वर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अजित शर्मा यांना भागलपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

Web Title: Lok Sabha MP from Muzaffarpur Bihar Ajay Nishad resigned from BJP and joined Congress today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.