शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
5
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
6
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
7
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
8
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
9
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
10
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
11
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
12
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
13
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
14
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
15
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
16
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
17
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
18
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
19
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"

आप नेते कुमार विश्वास भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढणार? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 10:59 AM

आम आदमी पार्टीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जवळचे असलेले कवी कुमार विश्वास आता भाजपाच्या वाटेवर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नवी दिल्ली: आम आदमी पार्टीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जवळचे असलेले कवी कुमार विश्वास आता भाजपाच्या वाटेवर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दिल्लीतील भाजपा प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी सोमवारी रात्री कुमार विश्वास यांची भेट घेतली. यावरुन कुमार विश्वास आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत असतील, अशी चर्चा सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. जर, कुमार विश्वास भाजपामध्ये गेले तर त्यांना भाजपा पूर्व दिल्ली मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकतो. 

अरविंद केजरीवाल यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे राज्यसभा निवडणुकीची आपकडून उमेदवारी देताना कुमार विश्वास यांचा पत्ता कापण्यात आला होता. पक्षाच्या विविध कार्यक्रमांतही त्यांना डावलण्यात आले. त्यानंतर आता राजस्थानच्या प्रभारीपदावरून दूर करण्यात आल्याने कुमार विश्वास आणि आपमधील दुरावा आणखीच वाढल्याचे दिसून आले. याचबरोबर, गेल्या काही दिवसांपासून अरविंद केजरीवाल यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून कुमार विश्वास टीका करताना दिसत आहेत.

दरम्यान, जसजशा लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. तसा राजकीय पक्षांनी प्रचाराला जोर धरला आहे. तसेच, व्यापक जनाधार असलेल्या नेत्यांसोबत लोकप्रिय कलाकर मंडळींनाही पक्षात सामील करुन घेण्यासाठी राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरु आहेत. यात भाजपा सुद्धा आघाडीवर आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भोजपुरी अभिनेता रवी किशन आणि दिनेश लाल यादव यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNew Delhiनवी दिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल