नवी दिल्ली - केंद्र सरकारवर निशाणा साधताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी ‘हम दो, हमारे दो’ (Hum Do Hamare Do) अशी टिप्पणी केली होती. यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी जबरदस्त पलटवार केला आहे. यावर बोलताना ठाकूर म्हणाले, राहुल यांच्या बोलण्याचा आशय ‘दीदी, जीजाजी आणि त्यांचे कुटुंब’ असा असेल. (Union minister Anurag Thakur attack on Rahul Gandhi)
लोकसभेत अर्थसंकल्पावर चर्चा करताना, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत ठाकूर म्हणाले, राहूल गांधी अर्थसंकल्पावर तयारी करून आले नाही. काँग्रेस नेते सभागृह आणि देशातही कमीच राहतात. तसेच ते हम दो, हमारे दोवर बोलतात, असे म्हणून ते दीदी, जीजाजी तथा मुलांच्या संदर्भात बोलतात, असे ठाकूर म्हणाले.
Rahul Gandhi in Loksabha: लिहून घ्या, शेतकरी एक इंचही मागे हटणार नाही; राहुल गांधी लोकसभेत गरजले
अनुराग ठाकूर म्हणाले, ‘‘मी राहुल गांधी यांना विचारू इच्छितो, की ते ज्या दोन उद्योगपती घरांसंदर्भात बोलत आहेत, त्यांना केरळमध्ये काँग्रेस सरकार असताना बंदर का देण्यात आले? हे आपलेच आहेत, आपणच पाळले आहेत.’’
राहुल गांधींवर निशाणा साधत ते म्हणाले, ‘‘असे कुठे लिहिले आहे, की अमेठीतून निवडणूक लढणारे राहुल गांधी निवडणूक हारल्यानंतर वायनाडमधून निवडणूक लढू शकत नाही. ते कुठूनही निवडणूक लढू शकतात. मग, अमेठीतील शेतकरी वायनाडमध्ये आपले पीक का विकू शकत नाही?’’ एवढेच नाही, तर काँग्रेस आणि काही इतर पक्षांचे लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत,असेही ठाकूर म्हणाले.
यावेळी, अर्थसंकल्प 2021-22 वर बोलताना अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, या अर्थसंकल्पात आशेचा किरण दिसतो. तसेच यात, देशाला आत्मनिर्भर बनविण्याबरोबरच नव्या भारताची रचना करण्यावरही भर देण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प पंतप्रधान मोदींच्या ‘‘सशक्त भारत’’ विचारानुरूप आहे. एवढेच नाही, तर सर्वच स्थरांतून यांचे कौतुक करण्यात आले आहे.
सरकार जवानांच्या बलिदानाचा अपमान का करतंय?: राहुल गांधी
काय म्हणाले होते राहुल गांधी - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोघे देशातील दोन बड्या उद्योगपतींसाठी देश चालवत असल्याचा घणाघात राहुल गांधी यांनी केला होता. "देश फक्त हम दो आणि हमारे दो यांच्यासाठीच चालवला जात आहे. यात हम दो आणि हमारे दो कोण आहेत, हे आता संपूर्ण देशाला माहित झाले आहे. हे फक्त शेतकऱ्यांचे आंदोलन आहे, असे जर तुम्ही समजत असाल तर ही मोठी चूक आहे. हे शेतकऱ्यांचे नाही, तर संपूर्ण देशाचे आंदोलन आहे. मी आजही लिहून देतो की कृषी कायदे रद्द केल्याशिवाय शेतकरी एक इंचही मागे हटणार नाहीत. मोदींना कृषी कायदे रद्द करावेच लागतील", असेही राहुल गांधी म्हणाले होते.