शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
3
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
4
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
5
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
6
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
7
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
8
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
9
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
10
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
11
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
12
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
13
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
14
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
15
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
17
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
18
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
19
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
20
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'

"देशातील जनतेचा विश्वास फक्त नरेंद्र मोदींवर", निकालानंतर अमित शाहंची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 8:28 PM

Lok Sabha Election Result 2024: "एनडीएला सलग तिसऱ्यांदा देश सेवेची संधी दिल्याबद्दल आभार."

Lok Saha Election Result 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अतिशय धक्कादायक निकाल लागले आहेत. 400 पार चा नारा देणाऱ्या भाजपला 300 चा आकडाही पार करता आला नाही, तर इंडिया आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. एनडीएला 290+ जागा मिळाल्या आहेत, तर इंडिया आघाडीनेही 230+ जागा मिळवल्या आहेत. भाजपला एकट्याने बहुमत गाठला आले नाही, पण मित्रपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करता येईल. दरम्यान, आजच्या निकालांवर गृहमंत्री अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

जनतेचा विश्वास मोदींवर- अमित शाहकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निकालानंतर आपल्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले की, ''एनडीएचा हा विजय म्हणजे देशासाठी आयुष्य खपवणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्यावरील लोकांच्या अढळ विश्वासाचे प्रतिबिंब आहे. मोदीजींच्या विकसित भारताच्या व्हिजनवर जनतेचा हा विश्वास आहे. हा सार्वजनिक आशीर्वाद म्हणजे मोदीजींच्या गरीब कल्याण, वारशाचे पुनरुज्जीवन, महिलांचा स्वाभिमान आणि शेतकरी कल्याणाच्या कामाच्या यशाचा आशीर्वाद आहे. या जनादेशासह विकासाच्या प्रवासाला अधिक गती आणि बळ देण्यासाठी न्यू इंडिया तयार आहे," असे शाह म्हणाले.

आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, "देशातील गरीब, महिला, मागास, वंचित आणि तरुणांची स्वप्ने साकार करण्यासाठी मोदीजींनी गेल्या 10 वर्षात केलेल्या प्रयत्नांसाठी एनडीएचा हा विजय म्हणजे जनतेचा आशीर्वाद आहे. या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करतो. हा विजय मोदीजींच्या अखंड भक्तीचा परिणाम आहे. स्वतःची पर्वा न करता आणि केवळ देश आणि देशवासियांच्या कल्याणासाठी रात्रंदिवस काम करत असलेल्या मोदीजींच्या मॅरेथॉन प्रयत्नांचा हा विजय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएला सलग तिसऱ्यांदा देश सेवेची संधी दिल्याबद्दल मी देशातील जनतेला सलाम करतो. सलग तिसऱ्या विजयाने जनतेचा विश्वास फक्त मोदींवर असल्याचे स्पष्ट झाले आहे," असे शाह म्हणाले.

निकालानंतर पंतप्रधानांचे पहिले ट्विटनिकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्विट करुन जनतेचे आभार मानले. ''देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा एनडीएवर विश्वास व्यक्त केला आहे. भारताच्या इतिहासातील हा अभूतपूर्व क्षण आहे. या प्रेम आणि आशीर्वादासाठी मी माझ्या कुटुंबियांना प्रणाम करतो. मी देशवासियांना खात्री देतो की त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही नवीन ऊर्जा, नवीन उत्साह आणि नवीन संकल्प घेऊन पुढे जाऊ. मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या समर्पण आणि अथक परिश्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो," असे मोदी म्हणाले.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदी