मुंबई - आयुष्यातील ३५ वर्ष भिक्षेवर जगलो असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. आपल्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित पैलूबद्दल त्यांनी अनेक खुलासे केले. गुजरात आणि चंडीगडमधील दिवस कसे काढले याबाबत त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
घर सोडल्यानंतर तब्बल ३२ वर्षांनी मी घरी परतलो . वडिलांचे निधन झाल्याचे माहित झाल्यावर घरी आलो. लोकांना विश्वास बसणार नाही पण मी याकाळात, माझ्या आयुष्यातील ३५ वर्ष भिक्षेवर काढली. काही वेळा मी जेवण बनवत होतो असेही ते म्हणाले. मला खिचडी बनवायला आवडते याबाबत मोदींनी मुलाखतीत सांगितले.
मोदींनी केलेल्या वक्तवनंतर विरोधकांनी त्या मुलाखतीचा व्हिडिओ पोस्ट करून मोदींवर निशाणा साधला आहे . मोदी हे काहीही बोलून जातात मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांची उत्तरे देताना दमछाक होते असा टोला राष्ट्रवादी पक्षाने लागवला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने मोदींचा मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेयर केला जात आहे.
१९९५ मध्ये भाजपला गुजरात मध्ये बहुमत मिळाले होते. निवडणुका होताच मला पक्षाने चंडीगडला पाठवले. चंडीगडमध्ये पाचवर्षे एका गॅरेजमध्ये काढले. पाच वर्षात मी एकदाही गुजरात बद्दल विचार केला नाही. मी जिथे जातो फक्त त्याच ठिकाणचे विचार करतो असेही मोदी म्हणाले.