मोदीजी पातळी सोडू नका; राजीव गांधींसाठी तरुणाचे रक्तरंजीत पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 11:32 AM2019-05-08T11:32:35+5:302019-05-08T11:59:16+5:30
मनोज याने आपल्या पत्रात म्हंटले आहे, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे अपमान दुःखदायक आणि वेदनादायक आहे. राजीव गांधींचा अपमान करणाऱ्या व्यक्तीची तुलना त्यांचा खून करणाऱ्या सोबत होते. अमेठीच्या पवित्र मातीशी राजीव गांधींचे भावनिक नात होत.
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातल्या प्रतापगढमध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधान संबधित निवडणूक आयोगाला अमेठी येथील एका तरुणाने चक्क रक्ताने पत्र लिहले आहे. मनोज कश्यप असे या तरुणाचे नाव असून तो अमेठी येथील रहवासी आहे. मनोज याने रक्ताने लिहलेला पत्र सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
मनोज याने आपल्या पत्रात म्हंटले आहे, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे अपमान दुःखदायक आणि वेदनादायक आहे. राजीव गांधींचा अपमान करणाऱ्या व्यक्तीची तुलना त्यांचा खून करणाऱ्या सोबत होते. अमेठीच्या पवित्र मातीशी राजीव गांधींचे भावनिक नात होत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मत मिळवण्यासाठी पातळी सोडून बोलू नये, ज्यामुळे लाखो लोकांच्या भावना दुखवल्या जातील असा उल्लेख मनोज याने आपल्या पत्रातून केला आहे. कॉंग्रेसच्या एका नेत्याने हा पत्र सोशल मिडियावर शेयर केला आहे.
स्वर्गीय राजीव गाँधी जी के मोदी के अपमान जनक टिप्पणी पर अमेठी के इस नवजवान ने निर्वाचन आयोग को चुनाव सम्पन्न होने के बाद खून से लिखा पत्र। pic.twitter.com/tEHTLZ1oRN
— Deepak Singh (@DeepakSinghINC) May 7, 2019
उत्तर प्रदेशातल्या प्रतापगढमध्ये शनिवारी झालेल्या रॅलीत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीना लक्ष्य करताना त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधींवरदेखील टीका केली. राजीव गांधीचे आयुष्य भ्रष्टाचारी नंबर वनच्या रुपात संपलं. हा देश चुकीला क्षमा करतो. मात्र फसवणूक करणाऱ्याला कधीही माफ करत नाही, अशा शब्दांमध्ये मोदींनी राजीव गांधींवर अप्रत्यक्ष टीका केली होती.
माजी पंतप्रधान राजीव गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका होत आहे. याआधी दिल्ली विद्यापीठाच्या २०० शिक्षकांनी मोदींच्या विधानाबद्दल तीव्र आक्षेप नोंदवला होता.