शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
4
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
5
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
6
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
7
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
8
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
9
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
10
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
12
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
13
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
14
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
15
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
16
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
17
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
18
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
19
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...

राफेल घोटाळ्यासाठी लोकपाल नियुक्तीला खो - सिब्बल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 5:28 AM

राफेल लढाऊ विमान सौद्यावरून सरकारला घेरत काँग्रेसने भडीमार सुरूच ठेवत राफेल घोटाळा करता यावा म्हणून पंतप्रधान मोदी यांनी लोकपालांची नियुक्ती टाळली, असा सडेतोड आरोप करीत सरकारला पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : राफेल लढाऊ विमान सौद्यावरून सरकारला घेरत काँग्रेसने भडीमार सुरूच ठेवत राफेल घोटाळा करता यावा म्हणून पंतप्रधान मोदी यांनी लोकपालांची नियुक्ती टाळली, असा सडेतोड आरोप करीत सरकारला पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.प्रख्यात विधिज्ञ आणि काँग्रेसचे खासदार कपिल सिब्बल यांनी राफेल सौद्यासंदर्भात तारीखवार तपशील देत या घोटाळ्यामागे मोदी यांचा हात होता, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. या सौद्याच्या वेळी ना अरुण जेटली होते; ना मनोहर पर्रीकर आणि निर्मला सीतारामन होत्या. तत्कालीन विदेश सचिव एस. जयशंकर यांनाही या सौद्याची कल्पना नव्हती. विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनाही या सौद्याची माहिती नव्हती. केवळ मोदी यांनाच सर्व काही माहिती होती.फ्रान्सचे माजी राष्टÑाध्यक्ष ओलांद यांच्या खुलाशानंतर मोदी बोलत का नाहीत? असा सवाल सिब्बल यांनी केला.रिलायन्स डिफेन्स कंपनीसोबत भागीदारी करावी लागेल, याची माहिती देसॉ कंपनीलाही नव्हती. अत्यंत विचारपूर्वक मोदी यांनी रिलायन्स डिफेन्सला पुढे करून सौदा ठरविला. ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा,’ असे बोलणारे मोदी यांनी आता ‘ना मैं बताऊंगा आणि ना बताने दूंगा’ अशी भूमिका घेतली आहे.उच्चपदस्थ सूत्रांनुसार राफेल सौद्यांबाबत काँग्रेसने आपल्या रणनीतीत मोठा बदल केला आहे. आता काँग्रेस फक्त मोदींवर निशाणा साधणार आहे.महागाई, पेट्रोलचे वाढते दर, शेतकºयांची दयनीय अवस्था, मल्ल्या, नीरव मोदीसह मोठ्या बँक घोटाळ्यांनंतरही मोदींची प्रतिमा जनतेत टिकून आहे. तेव्हा थेट मोदींवर हल्ले चढवीत जनतेला संभ्रमातून बाहेर काढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल.संरक्षण क्षेत्राच्या धोरणात केला बदल...सिब्बल यांनी मंगळवारी नवीनच गौप्यस्फोट केला. घोटाळा करण्याच्या हेतूने जून २०१६ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी संरक्षण क्षेत्राच्या धोरणात बदल केला. त्यातहत भारतीयांची हिस्सेदारी ५१ टक्के आणि विदेशी हिस्सेदारी ४९ टक्के करण्याची तरतूद करण्यात आली. त्यानंतर २४ आॅगस्ट २०१६ रोजी संरक्षण विभागाच्या मंत्रिमंडळस्तरीय समितीची यास मंजुरी घेण्यात आली. २३ डिसेंबर २०१६ रोजी आंतर-शासन करार केला जातो. त्यानुसार रिलायन्स डिफेन्सची ५१ टक्के आणि दसॉची ४९ टक्के भागीदारी होते.‘एचएएल’ला डावलण्याचा फायदा कोणाला?या सौद्यातून ‘एचएएल’ला डावलण्याचा फायदा कोणाला झाला? हे पंतप्रधानांनी सांगावे, असेही सिब्बल म्हणाले. तत्पूर्वी, रणदीप सुरजेवाला यांनी आरोप केला की, सातत्याने सरकार खोटे बोलत आहे. काँग्रेसवर मनमानी आरोप केला जात आहे. कारण मूळ प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलित व्हावे. या सौद्यांशी संबंधित दस्तावेज सरकारने खुले केल्यास कोण खोटे बोलते, याचा सोक्षमोक्ष लागेल, असे आव्हानही त्यांनी दिले.

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलnewsबातम्या