कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कर्नाटक लोकायुक्तांच्या पथकाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांच्या पत्नी पार्वती बीएम यांच्यावरील आरोपांची चौकशी सुरू केली आहे. या संदर्भात लोकायुक्तांचे तपास पथक म्हैसूरमधील वादग्रस्त जमिनी पाहणीला गेले आहे. आजचं मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या पत्नी यांनी ती जमिन परत देणार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, आता चौकशी सुरू केली आहे.
MUDA घोटाळ्याचा तपासाला सुरुवात केली आहे. या भूखंड वाटपावरून राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तपास पथकाने वादग्रस्त प्लॉटवर जाऊन तपास केला. या प्रकरणातील तक्रारदार स्नेहमोयी कृष्णाही हजर होते. एएनआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे, यामध्ये लोकायुक्त टीम जमीन मोजमापाची उपकरणे आणि उपकरणांसह वादग्रस्त भूखंडावर पोहोचल्याचे दिसत आहे.
'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
यावर बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, पत्नी पार्वती 'द्वेषाच्या राजकारणाची' शिकार झाली आहे. सिद्धरामय्या यांनीही पत्नीने १४ भूखंड परत करण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे. पत्नी पार्वती यांना द्वेषाच्या राजकारणामुळे मानसिक छळ सहन करावा लागला.माझ्या पत्नीने म्हैसूरमध्ये MUDA भूसंपादन न करता जप्त केलेल्या जमिनीची भरपाई म्हणून मिळालेल्या जमिनी परत केल्या आहेत,असंही ते म्हणाले.
राजकीय द्वेष निर्माण करण्यासाठी विरोधी पक्षांनी आपल्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल करून आपल्या कुटुंबाला वादात ओढले हे राज्यातील जनतेलाही माहीत असल्याचा दावा सीएम सिद्धरामय्या यांनी केला. ते म्हणाले, "या अन्यायाला बळी न पडता लढा देण्याची माझी भूमिका होती, परंतु माझ्या विरोधात सुरू असलेल्या राजकीय षडयंत्रामुळे त्रासलेल्या माझ्या पत्नीने ही जमीन परत करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचे मलाही आश्चर्य वाटते, असंही ते म्हणाले.
सीएम सिद्धरामय्या म्हणाले, “माझ्या पत्नीने माझ्या चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत कधीही ढवळाढवळ केली नाही आणि ती तिच्या कुटुंबापुरतीच मर्यादित राहिली, पण आज ती माझ्याविरुद्ध द्वेषपूर्ण राजकारणाची शिकार झाली आहे आणि मानसिक छळ सहन करत आहे. मी दु:खी आहे. जमीन परत करण्याच्या माझ्या पत्नीच्या निर्णयाचा मी आदर करतो.
सीएम सिद्धारामय्या यांच्या पत्नी पार्वती या कधी सार्वजनिक ठिकाणी दिसत नाहीत. त्यांनी सोमवारी MUDA ला पत्र लिहून MUDA ने वापरलेल्या त्यांच्या ३.१६ एकर जमिनीच्या बदल्यात त्यांना वाटप केलेले १४ भूखंड परत करण्याची इच्छा व्यक्त केली.