लोकमत समूहाचे वरिष्ठ पत्रकार शिव अनुराग पटेरिया यांचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 08:23 AM2021-05-13T08:23:30+5:302021-05-13T08:24:39+5:30

इंदोर येथील एका खासगी रुग्णालयात पटेरिया यांनी अंतिम श्वास घेतला. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे. पटेरिया गेल्या ४० वर्षांपासून पत्रकारितेशी जुळले होते.

Lokmat Group senior journalist Shiv Anurag Pateria passes away | लोकमत समूहाचे वरिष्ठ पत्रकार शिव अनुराग पटेरिया यांचे निधन 

लोकमत समूहाचे वरिष्ठ पत्रकार शिव अनुराग पटेरिया यांचे निधन 

Next

भोपाळ : लोकमत समूहाचे भोपाळचे ब्युरो चीफ व मध्य प्रदेशचे ज्येष्ठ पत्रकार शिव अनुराग पटेरिया यांचे बुधवारी निधन झाले. कोरोनाचा संसर्ग झाल्याने ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. 

इंदोर येथील एका खासगी रुग्णालयात पटेरिया यांनी अंतिम श्वास घेतला. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे. पटेरिया गेल्या ४० वर्षांपासून पत्रकारितेशी जुळले होते. त्यांनी वार्ताहर म्हणून १९७८मध्ये छत्तरपूर येथून पत्रकारितेला सुरुवात केली. राज्याच्या वेगवेगळ्या भागात त्यांनी आपली सेवा दिली. ते बऱ्याच काळापासून लोकमत समूहाशी जुळलेले होते. एक सजग व निडर पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती. 

हिंदी पत्रकारितेतील निष्पक्ष पत्रकार आज आम्ही हरविला. त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता क्षेत्रातील हानी भरून निघणार नाही. 
- शिवराज सिंह चौहान
मुख्यमंत्री, मध्य प्रदेश
शिव अनुराग पटेरिया यांची लेखणी कधी झुकली नाही, कधी थांबली नाही आणि वाकलीही नाही. ते एक परखड पत्रकार होते. त्यांची कमतरता आम्हाला नेहमीच भासेल. 
- विजय दर्डा, माजी खासदार व चेअरमन, लोकमत एडिटोरिअल बोर्ड
वरिष्ठ पत्रकार शिव अनुराग पटेरिया यांच्या निधनामुळे मी दु:खी झालो. त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांसाठी प्रेरणादायी होते. एक सामान्य व्यक्तिमत्त्व पण सर्वांनाच सोबत घेऊन चालणारे होते. 
- कमलनाथ, माजी मुख्यमंत्री, मध्य प्रदेश
 

 

Web Title: Lokmat Group senior journalist Shiv Anurag Pateria passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.