ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - लोकमत वृत्तपत्र दिवसेंदिवस प्रगती करत असून महाराष्ट्रात सर्वाधिक वाचले जाणारे वृत्तपत्र आहे, असे माजी लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील यांनी सांगितले. लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्याच्या पूर्वसंध्येला ते बोलत होते.
लोकमतच्या संस्थापकांसोबतही मला काम करण्याची संधी मिळाली आहे. लोकमत हे महाराष्ट्रात सर्वाधिक वाचले जाणारे वृत्तपत्र असून यामध्ये छापून येणारा मजकूरही विश्वासार्ह आहे. कोणावरही विनाकारण टीका किंवा कोणाचीही स्तुती लोकमत वृत्तपत्रातून केली जात नाही. तसेच, टीव्ही मीडियासारखी ते एकांगी भूमिका मांडत नाही. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी भाषेतूनही लोकमतचे वृत्तपत्र प्रसिद्ध होते, असे शिवराज पाटील म्हणाले.
लोकमत संसदीय पुरस्कारप्राप्त खासदारांना देशाच्या विकासासाठी केलेल्या कामाचा बहुमान मिळाला आहे. तसेच, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी सुद्धा योग्य प्रकारे स्वतःची जबाबदारी पार पाडली आहे. ब-याचदा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार न करता आपण मोठ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो. लोकमत संसदीय पुरस्कारसाठी मला बोलावल्याबद्दल लोकमत परिवार, विजय दर्डा, राजेंद्र दर्डा आणि त्यांच्या सहका-यांचा मी आभारी आहे. पुरस्कारप्राप्त खासदार अशाच प्रकारे स्वतःच्या कार्याचा गौरव करत राहतील, याची अपेक्षा आहे, असेही शिवराज पाटील यावेळी म्हणाले.