प्लॅनिंग कमिशनला म्हटले पंच ऑफ जोकर, मनमोहन सिंगांनी तो अपमान कसा गिळला असेल. राहुल गांधींनी भारताचा, संसदेचा, सैन्याचा अपमान केला ठीक आहे. पण त्यांनी गांधींचाही केला. त्यांच्यासाठी इंदिरा म्हणजे भारत, भारत म्हणजे इंदिरा असे होते, असा आरोप केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला. तरुण वर्गाला ठाकूर यांनी राहुल गांधींनी माफी मागावी की नाही असा प्रश्न विचारला. यावर श्रोत्यांमधून हो माफी मागायला हवी असे, उत्तर आले.
लोकमत संसदीय पुरस्कारांच्या चौथ्या आवृत्तीचा (वर्ष २०२२) पुरस्कार वितरण समारंभ माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १४ मार्चला दिल्लीत होत आहे. या पुरस्कार वितरण समारंभापूर्वी, तेलंगण सरकारच्या सहकार्याने 'लोकमत नॅशनल कॉनक्लेव्ह' होत आहे. 'भारतीय लोकशाही : परिपक्वतेच्या किती जवळ' (इंडियन डेमोक्रसी : हाऊ क्लोझ टू मॅच्युरिटी) या विषयावर विविध राजकीय पक्षातील ज्येष्ठ नेते आपले विचार मांडत आहेत.
मी अनुराग ठाकूर मंत्री आहे. या तरुण वर्गाने निवडून दिलेल्या खासदारांचेही हेच म्हणणे आहे, असे उत्तर अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी माफी मागत नाही तोवर संसदेचे कामकाज सुरु होऊ देणार नाही का, या प्रश्नावर दिले. राहुल गांधी कोणाचे ऐकत नाहीत. निदान त्यांनी इटलीच्या पंतप्रधानांचे तरी ऐकायला हवे होते. ते भारतात येऊन मोदींबद्दल चांगले बोलून गेले होते, असा टोलाही ठाकूर यांनी लगावला.
राहुल गांधी यांनी केंब्रिज केंब्रिज क्राईज, लंडन लाईज बंद करावे आणि इथे यावे. इंग्लंडची लोक मतदान करणार नाहीएत. तर इथले लोक करणार आहेत, असा सल्लाही ठाकूर यांनी दिला. दहशवाद्यांना फंडिंग कसे होते, यावर एक रिपोर्ट आला आहे. यात एक केस स्टडी घेण्यात आली होती. काँग्रेस कसे भष्ट्राचार करत होते यावर आता जगभरात केस स्टडी केला जात आहे, असा टोला ठाकूर यांनी लगावला.
तेलंगणमध्ये ९ वर्षांपासून कोण महिला मंत्री आहे? महिला सशक्तीकरणावर आता बोलत आहेत. तेलंगण लुटले आता दिल्लीला आलेत. के कविताबद्दल बोलताहेत. राहुल गांधी हे जामिनावर बाहेर आहेत. हेराल्ड केसमध्ये का नाही ते रोज सुनावणी घ्या म्हणून सांगत आहेत. लालू प्रसादांना मी विसरलोच, त्यांनी जनावरांचा चारा खाल्ला त्यांनी तुम्हाला कसे सोडले असते. तुम्ही मला जमिन द्या मी तुम्हाला नोकरी देतो. लालू मॉडेल कधी परदेशांत शिकविले जायचे. आता प्रियंका गांधींचे मॉडेल शिकविले जातेय, असा आरोप ठाकूर यांनी केला.