नवी दिल्लीः 'लोकमत नॅशनल कॉन्ल्केव्ह'मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेत आहेत इंडिया टीव्हीचे एडिटर इन चीफ रजत शर्मा.या मुलाखतीचे लाइव्ह अपडेट्स
>> काही फॉर्म्युले तयार केलेत; शिवसेनेशी युती होणारच
>> राज ठाकरे माझे मित्र. मतं मांडतात, पण त्यांना कुणी गांभीर्याने घेत नाही. तुम्हीही गंभीरपणे घेऊ नका.
>> राहुल गांधींचं अभिनंदन. राजस्थान, मध्य प्रदेशात जी मतं मिळाली, ती पाहता मोठा पराभव नाही. आत्मपरीक्षण नक्कीच करू.
>> एकाच व्यक्तीवर टीका करू नये, हे शरद पवारांना १९९९ मध्ये लक्षात आलं असतं तर राष्ट्रवादी पक्षाची स्थापनाच झाली नसती.
>> अहंकार हे पराभवाचं कारण नाही. आम्ही जमिनीशी जोडलेली माणसं.
>>भाजपाचा कुणीही मालक नाही. ही कुठल्याही परिवाराची गोष्ट नाही. माझ्यासारखा माणूस इथे मुख्यमंत्री बनू शकतो.
>>काँग्रेसमुक्त भारत याचा अर्थ एखाद्या पक्षापासून मुक्ती नाही, तर काँग्रेसने निर्माण केलेल्या प्रवृत्तीपासून मुक्तता देणं.
>> तीन राज्यं भाजपामुक्त कशी म्हणता येतील? राजकारणात कुणी कुणाला समाप्त करू शकत नाही, जनताच समाप्त करू शकतं.
>> पराभव झाला हे मान्यच. पण, राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सरकारं बदलतातच. पण, यावेळी भाजपा आणि काँग्रेसमध्ये फक्त ०.५ टक्के मतांचा फरक. जो जिता वही सिकंदर, पण त्यामुळे भाजपाला नाकारलं असं म्हणता येणार नाही.
>> देशात सक्षम विरोधी पक्ष असणं चांगलं. राहुल गांधींना आणखी पाच-दहा वर्षं विरोधकांचं नेतृत्व करायचं आहे. त्यामुळे ते जितकं चांगलं लीड करताहेत, ते चांगलंच.
>> शिवसेना आमच्यासोबतच राहील. तुम्हाला जे 'तेवर' दिसतात, त्यापेक्षा वेगळे 'तेवर' आम्हाला माहीत आहेत.
>> रामाच्या नावावर राजकारणाचा प्रश्नच नाही. हल्ली राहुल गांधी खूप देवळात जाताहेत. त्यांनी मदत केली तर राम मंदिराचा कायदाही बनू शकतो.
>> नोटाबंदी, जीएसटीनंतर ११ राज्यांत भाजपा जिंकली, हे तुम्ही पाहात नाही. एक निवडणूक हरली तर तुम्ही असा गोंधळ करता की आम्ही पुन्हा निवडूनच येणार नाही. पण २०१९ मध्ये पुन्हा मोदीच निवडून येणार. हा अतिआत्मविश्वास नाही, आत्मविश्वास.
>> महाआघाडी बनो, न बनो... जनतेला नरेंद्र मोदींचंच नेतृत्व हवंय.
>> मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली. मुद्रामुळे अनेकांना कर्ज मिळाली, त्यांना रोजगार मिळालाच की.
>> चार वर्षांत प्रत्येक प्रश्न संपेल असं नाही. मोदींनी चार वर्षांत पटरीवरून उतरलेली गाडी पटरीवर आणली आहे, आता ती वेगाने पुढे जाईल.