नवी दिल्लीः भारताच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांची भूमिका योग्य नाही. देशानं 1990-2000मध्ये राजकीय अस्थिरता पाहिली आहे. प्रादेशिक पक्ष हे देशाच्या राजकारणासाठी योग्य नाहीत. प्रादेशिक पक्षांमुळेच भ्रष्टाचार होतो, असा आरोपही पीयूष गोयल यांनी केला आहे. लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणावरही भाष्य केलं आहे. आम्ही युती म्हणून लढलेल्या 288पैकी 164 जागा जिंकलो. भाजपानं 105 जागांवर विजय मिळवला. महाराष्ट्रात आम्हीयाचा अर्थ आम्ही लढवलेल्या 65 ते 70 टक्के जागा जिंकल्या. पण शिवसेनेनं आमच्याशी गद्दारी केली. युतीचा धर्म पाळला नाही. जर भाजपानं महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुका लढवल्या असत्या तर आमचं सरकार नक्कीच आलं असतं. शिवसेना शत्रूच्या गोटात जाऊन सामील झाली. शिवसेनेनं सर्वच सिद्धांत मोडीत काढले आहेत. शिवसेना कालपर्यंत ज्यांच्यावर टीका करत होती, त्यांच्यासोबतच जाऊन बसली आहे.
Lokmat Parliamentary Awards: शिवसेना गद्दार, युतीचा धर्म पाळला नाही- पीयूष गोयल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 5:30 PM