Lokmat Parliamentary Awards 2023: सर्वात विश्वसनीय आणि प्रतिष्ठित 'लोकमत' संसदीय पुरस्कारांचा पाचवा पुरस्कार सोहळा आज दिल्लीत आयोजित करण्यात आला. प्रमुख पाहुणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. 'लोकमत' संसदीय पुरस्कारासाठी यंदा आठ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ८ खासदारांची निवड करण्यात आली. सर्वोत्कृष्ट महिला संसदपटू म्हणून दोन महिला खासदारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सर्वोत्कृष्ट महिला संसदपटू म्हणून अकाली दलाच्या लोकसभेतील खासदार हरसिमरत कौर बादल आणि भाजपाच्या राज्यसभा खासदार सरोज पांडे यांना नितीन गडकरींच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. मंगळवारी नवी दिल्लीतील जनपथ रोडवर असलेल्या डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
हरसिमरत कौर या पंजाबमधील एका मोठ्या राजकीय घराण्यातील आहेत. त्यांचे पती सुखबीर सिंग बादल हे पंजाबचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आहेत. त्यांचे सासरे दिवंगत प्रकाशसिंग बादल हे पंजाबचे मुख्यमंत्री राहिले आहेत. कौर यांचे भाऊ विक्रम सिंह मजिठिया हे देखील एसएडी पक्षाचे नेते असून माजी राज्यमंत्री आहेत.
राज्यसभेच्या खासदार सरोज पांडे यांना अतिशय शांत पण मुद्दे मांडण्यात चपळ राजकारणी म्हणून ओळखले जाते. छत्तीसगडमधील दुर्ग येथील सरोज पांडे यांनी प्रमुख मुद्द्यांना हात घालून प्रभावी कामगिरी केली आहे. त्या खासदार, आमदार आणि महापौर राहिल्या आहेत. सरोज पांडे यांना सर्वोत्कृष्ट महिला संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार विजेत्यांची नावे -
जीवनगौरव - मनेका गांधी, माजी केंद्रीय मंत्री, खासदार लोकसभाप्रा. रामगोपाल यादव, नेते, सपा, राज्यसभा
सर्वोत्कृष्ट संसदपटू -डॉ. शशी थरूर, काँग्रेस, लोकसभाडॉ. सस्मित पात्रा, बिजू जनता दल, राज्यसभा
सर्वोत्कृष्ट महिला संसदपटू -हरसिमरत कौर बादल, अकाली दल, लोकसभासरोज पांडे, भाजप, राज्यसभा
सर्वोत्कृष्ट नवोदित संसदपटू -कुंवर दानिश अली, बसप, लोकसभाडॉ. जॉन ब्रिटास, माकप, राज्यसभा