राजधानी दिल्लीत आयोजित लोकमत संसदीय पुरस्कार 2023 सोहळ्यामध्ये मनेका गांधी यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच राज्यसभा खासदार आणि प्रा. राम गोपाल यादव यांनाही जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
सर्वाधिक विश्वसनीय आणि प्रतिष्ठित लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्याचं यंदा ५ वं वर्ष आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला.
मनेका गांधी या राजकारणाबरोबर मुक्या प्राण्यांच्या हक्कासाठी देखील लढतात. त्या भाजपाच्या राजसभा सदस्य देखील आहेत. दिवंगत भारतीय राजकारणी संजय गांधी यांच्या त्या पत्नी होत. मनेका गांधी या चार सरकारांमध्ये मंत्री राहिल्या आहेत.
राम गोपाल यादव हे समाजवादी पक्षाचे मुख्य प्रवक्ते आहेत. खासदार म्हणून ते पक्षाची धोरणे सभागृहात अतिशय चांगल्या पद्धतीने मांडतात. राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असल्याने राम गोपाल यादव अनेकदा सरकारच्या धोरणांवर टीका करताना दिसतात. राजकारणाव्यतिरिक्त त्यांनी कायदा आणि प्राणी कल्याण या क्षेत्रातही अनेक पुस्तके लिहिली आहेत.