Lokmat Parliamentary Awards: लोकमत संसदीय पुरस्कार चौथ्या वर्षाचे पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी दिल्लीत पार पडला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना जीवनगौरव पुरस्कार तर एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांना सर्वोत्कृष्ट संसदपटू (लोकसभा) पुरस्काराने गौरवण्यात आले. देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते आणि त्यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
आज काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना जीवनगौरव पुरस्कार तर बिजू जनता दलचे भर्तृहरी मेहताब यांनाही जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
सर्वोत्कृष्ट संसदपटू (लोकसभा) एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवैसी, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ'ब्रायन यांना सर्वोत्कृष्ट संसदपटू (राज्यसभा), यांना प्रदान करण्यात आला.
सर्वोत्कृष्ट महिला संसदपटूमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण, तर भाजपच्या लॉकेट चॅटर्जी यांना प्रदान करण्यात आला.
सर्वोत्कृष्ट नवोदित संसदपटूमध्ये भाजपचे तेजस्वी सूर्या आणि आरजेडीच्या प्रा. मनोजकुमार झा यांना प्रदान करण्यात आले.
लोकमत संसदीय पुरस्कार २०२२ चे विजेते
जीवनगौरवमल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते, राज्यसभाभर्तृहरी मेहताब, बिजू जनता दल
सर्वोत्कृष्ट संसदपटूअसदुद्दीन ओवैसी, एआयएमआयएमडेरेक ओ'ब्रायन, तृणमूल काॅंग्रेस
सर्वोत्कृष्ट महिला संसदपटूवंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसलॉकेट चॅटर्जी, भाजप
सर्वोत्कृष्ट नवोदित संसदपटूतेजस्वी सूर्या, भाजप प्रा. मनोजकुमार झा, आरजेडी