14 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी पुलवामामध्ये भारतीय जवानांच्या बसला लक्ष्य केलं. या हल्ल्यात भारतमातेच्या 40 जवानांना वीरमरण आलं. या हल्ल्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवरून निषेध नोंदवण्यात आला. अमेरिका, रशियासारख्या शक्तिशाली देशांनीही भारतानं पाकिस्तानविरोधात निर्णायक कारवाई करावी, असा सल्ला दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर भारतानं पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटनांवर एअर स्ट्राइक केला. या एअर स्ट्राइकबद्दल आपलं मत काय?तसंच यापुढे भारताने पाकिस्तानशी कसे संबंध ठेवावेत, त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी कुठला मार्ग निवडावा, याबद्दलही आम्हाला आपलं मत जाणून घ्यायचंय.
लोकमत सर्व्हे: एअर स्ट्राईकबद्दल, पाकिस्तानशी संबंधांबद्दल काय वाटतं?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 9:34 PM